शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

West Bengal : "ममता बॅनर्जींवर टीका करणं सोडून द्या आणि आत्मपरिक्षण करा"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 6:56 PM

TMC मधून BJP मध्ये आलेल्या खासदाराच्या मुलाचा सल्ला. रॉय यांनी २०१९ मध्ये तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये केला होता प्रवेश.

ठळक मुद्देTMC मधून BJP मध्ये आलेल्या खासदाराच्या मुलाचा सल्ला.रॉय यांनी २०१९ मध्ये तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये केला होता प्रवेश.

पश्चिम बंगालमधील (West Bengal) सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसला (Trinamool Congress) सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये (BJP) आलेले खासदार मुकुल रॉय (Mukul Roy) यांचे सुपुत्र शुभ्रांशु रॉय यांनी आपल्याच पक्षाला घरचा अहेर दिला आहे. "पक्षानं ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करणं बंद करावं," असा सल्ला त्यांनी आपल्याच पक्षाला दिला आहे. दरम्यान, त्यांच्या या सल्ल्यानंतर पराभवानंतर भाजपमध्ये असंतोष पसरला आहे का? असा सवाल आता केला जात आहे. "लोकांच्या समर्थनानं आलेल्या सरकारवर टीका करण्यापूर्वी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. निवडून आलेल्या सरकारवर टीका करणं बंद करा आणि आत्मपरीक्षण करा," असा सल्ला रॉय यांनी दिला. त्यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे यावर भाष्य केलं. त्यांची ही फेसबुक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाली आहे. शुभ्रांशु रॉय यांनी २०१९ मध्ये तृणमूल काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केला होता. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी बिजपुर येथून निवडणूक लढवली होती. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. काही दिवसांपूर्वी 'यास' चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोलकात्याला गेले होते. त्यानंतर त्यांनी एक समीक्षा बैठकीचंही आयोजन केलं होतं. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे मुख्य सचिव या बैठकीत अर्धा तास उशीरानं पोहोचले होते. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी २० हजार कोटी रूपयांच्या मागणीची यादी देत काढता पाय घेतला होता. यानंतर भाजपनं ममता बॅनर्जींवर टीका केली होती. तसंच ममता बॅनर्जी यांनीदेखील आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर उत्तर दिलं होतं.     

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदी