"राकेश टिकैत 'दरोडेखोर', परदेशातील पैशातून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू"; भाजपाचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 10:23 AM2021-09-22T10:23:06+5:302021-09-22T10:24:34+5:30

BJP Akshaywar Lal Gond And Rakesh Tikait : कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारे शेतकरी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये याआधी अनेकदा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे.

BJP mp Akshaywar Lal Gond criticized bku leader Rakesh Tikait | "राकेश टिकैत 'दरोडेखोर', परदेशातील पैशातून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू"; भाजपाचा गंभीर आरोप 

"राकेश टिकैत 'दरोडेखोर', परदेशातील पैशातून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू"; भाजपाचा गंभीर आरोप 

Next

नवी दिल्ली - गेल्या कित्येक महिन्यांपासून केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरूद्ध शेतकरी आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारे शेतकरी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये याआधी अनेकदा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. किसान महापंचायतीनंतर, आंदोलक शेतकऱ्यांविरोधात भाजपाचे नेते आक्रमक झाले आहेत. वादग्रस्त विधानं करत आहेत. उत्तर प्रदेशमधील बहराईचचे भाजपा खासदार अक्षयवर लाल गोंड ( BJP Akshaywar Lal Gond) यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांना "दरोडेखोर’" म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच परदेशातील पैशातून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.

योगी सरकारला साडे चार वर्षे झाली म्हणून बहराईचमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भाजपा खासदार अक्षयवर लाल गोंड यांनी राकेश टिकैत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. "राकेश टिकैत हे दरोडेखोर, शेतकरी आंदोलकांना परदेशातून पैसा मिळतो" असं म्हटलं आहे. तसेच शेतकरी आंदोलकांना पाकिस्तान, खलिस्तानवादी ठरवले. इतर देशांतून मोठ्या प्रमाणावर आंदोलनासाठी पैसा पुरवला जात असल्याचाही दावा गोंड यांनी केला. आंदोलनात शेतकरी नसून राजकीय पक्षाचे लोक सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांनी आंदोलन केले असते तर, फळ-भाज्या, दूध, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला असता असं अक्षयवर लाल गोंड यांनी म्हटलं आहे. 

"शेतकऱ्यांची कुठलीही चिंता नाही, 'किसान महापंचायत'च्या मागे राजकीय अजेंडा"

काही दिवसांपूर्वी भाजपाने मुझफ्फरनगरमध्ये 'किसान महापंचायत' नाही तर 'निवडणूक सभा' होत असल्याचं म्हटलं होतं. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चा राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप देखील भाजपाने केला होता. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाने मुझफ्फरनगरमध्ये 'किसान महापंचायत' आयोजित केली होती. यामध्ये उत्तर प्रदेश आणि शेजारी राज्यांमधील हजारो शेतकरी सहभागी झाले होते. भाजपाने यावरून जोरदार निशाणा साधत हल्लाबोल केला होता. "शेतकऱ्यांची चिंता नाही, 'किसान महापंचायत'च्या मागे राजकीय अजेंडा" असल्याचं म्हटलं होतं.

 "उत्तर प्रदेश निवडणुकांआधी होणार मोठ्या हिंदू नेत्याची हत्या"; राकेश टिकैत यांचं वादग्रस्त विधान

भाजपाचे किसान मोर्चाचे प्रमुख आणि खासदार राजकुमार चाहर यांनी 'किसान महापंचायत'च्या मागे राजकीय अजेंडा आहे. त्यांना शेतकऱ्यांची कुठलीही चिंता नाही. ही 'किसान महापंचायत' नाही, तर राजकीय निवडणूक बैठक होती. विरोधी पक्ष आणि किसान संघटना राजकारणासाठी शेतकऱ्यांचा दुरुपयोग करत आहेत असं म्हटलं होतं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गेल्या सात वर्षांत जे काम शेतकऱ्यांसाठी केले आहे तितके काम कुठल्याच सरकारने केलेलं नाही असा दावा देखील चाहर यांनी केला. केंद्र सरकारच्या नव्या कृषा कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या अनेक संघटना गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत.


 

Web Title: BJP mp Akshaywar Lal Gond criticized bku leader Rakesh Tikait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.