भाजपा आमदाराच्या पुतण्याची निर्घृण हत्या, भर बाजारात धडाधड झाडल्या गोळ्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 11:22 IST2024-03-06T11:22:28+5:302024-03-06T11:22:45+5:30

Bihar crime News: बिहारमधील कटिहार शहरामध्ये भाजपाच्या महिला आमदाराच्या पुतण्याची शूटर्सनी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या केली.

BJP MLA's Nephew Brutally Killed in Bihar, Bhar Bazar Shots Fired | भाजपा आमदाराच्या पुतण्याची निर्घृण हत्या, भर बाजारात धडाधड झाडल्या गोळ्या  

भाजपा आमदाराच्या पुतण्याची निर्घृण हत्या, भर बाजारात धडाधड झाडल्या गोळ्या  

बिहारमध्ये गुन्हेगारांनी पुन्हा एकदा दिवसाढवळ्या निर्घृण हत्या घडवून आणली आहे. बिहारमधील कटिहार शहरामध्ये भाजपाच्या महिला आमदाराच्या पुतण्याची शूटर्सनी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या केली. आज सकाळी हल्लेखोरांनी कटिहार जिल्ह्यातील कोढा  येथील भाजपा आमदार कविता पासवान  यांच्या पुतण्याला लक्ष्य करण्यात आले.

भर बाजारात झालेल्या गोळीबारामध्ये भाजपा आमदाराच्या पुतण्याचा घटनास्थळीच  मृत्यू झाला. मृत तरुणाचं नाव नीरज पासवान असल्याचे सांगण्यात येत आहे. तो कोढा येथीली महिला खासदार कविता पासवान यांचा पुतण्या होता. हा गोळीबार कटिहार शहरातील नगर ठाणे क्षेत्रात झाला.

मिळत असलेल्या माहितीनुसार हत्येच्या या घटनेप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मृत नीरज पासवान हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. तसेच तो माजी महापौर शिवराज पासवान हत्याकांडामधील आरोपी होता. हल्लीच तो तुरुंगातून सुटून बाहेर आला होता. आता या घटनेबाबत सविस्तर माहिती समोर येण्याची वाट पाहिली जात आहे. मात्र दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्याकांडामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.  

Web Title: BJP MLA's Nephew Brutally Killed in Bihar, Bhar Bazar Shots Fired