'मुस्लिमांच्या जमिनीवर महाकुंभ' ऐकताच भाजप आमदार टी राजा सिंह भडकले; म्हणाले, "बेटा, तब तुम्हारी नस्ल भी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 12:33 IST2025-01-07T12:31:55+5:302025-01-07T12:33:53+5:30

Kumbh Mela 2025 :  या व्हिडिओमध्ये राजासिंह यांनी म्हटेल आहे, "काही मस्लिम लोक म्हणत आहेत की, ज्या ठिकाणी महाकुंब होत आहे, त्या ठिकाणची 35 एकर जमीन Waqf Board ची आहे. तर मी त्या मुस्लिम लोकांना विचारेन की..."

BJP MLA T Raja Singh got angry after hearing Mahakumbh on Muslim land; said Son, then your race too... | 'मुस्लिमांच्या जमिनीवर महाकुंभ' ऐकताच भाजप आमदार टी राजा सिंह भडकले; म्हणाले, "बेटा, तब तुम्हारी नस्ल भी..."

'मुस्लिमांच्या जमिनीवर महाकुंभ' ऐकताच भाजप आमदार टी राजा सिंह भडकले; म्हणाले, "बेटा, तब तुम्हारी नस्ल भी..."

भारतीय जनता पक्षाचे आमदार टी. राजा सिंह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म "X" वर जबरदस्त व्हायरल होत आहे. यात त्यांनी प्रयागराज यथे होत असलेल्या महाकुंभमेळ्यासंदर्भात भाष्य केले आहे. या व्हिडिओमध्ये राजासिंह यांनी उत्तर प्रदेशात होत असलेल्या या कुंभमेळ्याच्या भव्यतेचे कौतुक करत, हा कुंभमेळा प्रत्येक सनातनी व्यक्तीसाठी गर्वाता विषय असल्याचे म्हटले आहे. यावेळी त्यांनी साधू-संत आणिसनातनी लोकांना या महाकुंभमेळ्याच्या शुभेच्छाही दिल्या.

या व्हिडिओमध्ये राजासिंह यांनी म्हटेल आहे, "काही मस्लिम लोक म्हणत आहेत की, ज्या ठिकाणी महाकुंब होत आहे, त्या ठिकाणची 35 एकर जमीन Waqf Board ची आहे. तर मी त्या मुस्लिम लोकांना विचारेन की, 'बेटा जेव्हा प्रयागराजला सुरुवात झाली, तेव्हापासून आतापर्यंत हजारोवर्षं झाले आहेत. जेव्हा तुमचा वंशदेखील या धरतीवर जन्माला आलेला नव्हता, तेव्हापासून महाकुंभाचे आयोजन केले जात आहे.'" 

राजा सिंह यांचे उत्तर प्रदेश सरकारला आवाहन -
राजा सिंह पुढे म्हणाले, "मी आपले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आवाहन करतो की, अशा लोकांना शांतता आणि प्रेमाची भाषा समजत नाही. यांना केवळ दोन भाषा समजतात, पहिला भाषा बुलडोझर, तर दुसरी भाषा... आपण समू शकता. यांना या दोनच भाषांनी समजावण्याची आवश्यकता आहे."

एवढेच नाही तर, "यांना समजेल त्या भाषेत आपण समजावले नाही, तर येणाऱ्या काळात प्रत्येक प्राचिन गोष्टीवर हे वक्फ बोर्डाचा दावा ठोकण्याचा हे लोक प्रयत्न करतील. यामुळे यांना बुलडोजरची झलक दाखवण्याची आवश्यकता आहे."
 

Web Title: BJP MLA T Raja Singh got angry after hearing Mahakumbh on Muslim land; said Son, then your race too...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.