VIDEO : बलात्कार प्रकरणी भाजपा मंत्र्याचे धक्कादायक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 20:44 IST2019-06-09T20:25:13+5:302019-06-09T20:44:18+5:30

'बलात्काराचे वेगळे नेचर असते'

bjp minister upendra tiwari gives controversial statement says rape has many natures | VIDEO : बलात्कार प्रकरणी भाजपा मंत्र्याचे धक्कादायक विधान

VIDEO : बलात्कार प्रकरणी भाजपा मंत्र्याचे धक्कादायक विधान

लखनऊ : उत्तर प्रदेशात सतत महिलांवर अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. यातच मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ  सरकारमधील एका मंत्र्याने वादग्रस्त विधान केले आहे. उपेंद्र तिवारी असे या भाजपाच्या मंत्र्याचे नाव असून त्यांनी बलात्कार वेगवेगळ्या नेचरचा असतो, असे धक्कादायक विधान केले आहे.   

उत्तर प्रदेशात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपेंद्र तिवारी म्हणाले, "बलात्काराचे वेगळे नेचर असते. आता जर कोणत्या अल्पवयीन मुलीसोबत बलात्कार झाला तर त्याला आम्ही बलात्कार समजू. मात्र, काही ठिकाणी ऐकिवात येत आहे की, विवाहित महिला आहेत. त्यांचे 30-35 वय आहे. त्याचे वेगवेगळे नेचर आहे." 


याचबरोबर, उपेंद्र तिवारी म्हणाले, "सर्व अशा घटना असतात, सर्व गोष्टी पाहायला मिळतात की, जसे एखादी तरुणी आहे. तिचा सात-आठ वर्षांपासून प्रेम प्रपंच सुरु आहे. तरी सुद्धा असे ऐकायला मिळते की तिच्यासोबत असे (बलात्कार) काही झाले, तर साधा प्रश्न आहे की तिने सात वर्षांपूर्वी हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे. अशा प्रकारे सर्व विसंगती असून वेगवेगळे नेचर आहे. अशा प्रकारच्या घटना आहेत, त्यावर स्वत: मुख्यमंत्री माहिती घेऊन कारवाई करत आहेत."

दरम्यान, उत्तर प्रदेशातील अलीगड येथे अडीच वर्षाच्या मुलीच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. या मुलीच्या हत्येबाबत खळबळजनक माहिती समोर येत असून, अनेक यातना देऊन या मुलीची हत्या करण्यात आल्याचे तसेच तिच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे समोर आले आहे. या मुलीच्या हत्येप्रकरणी एका महिलेसह अजून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या हत्या प्रकरणात अटक आरोपींची संख्या 4 झाली आहे. पैशांच्या देवाणघेवाणीतून झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी मुलीची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. 

Web Title: bjp minister upendra tiwari gives controversial statement says rape has many natures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.