Video - तुफान राडा! उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासमोरच भाजपा नेते आपापसात भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 18:22 IST2026-01-30T18:21:37+5:302026-01-30T18:22:28+5:30

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत भाजपा नेत्यांमध्ये झालेल्या वादाने पक्षाच्या अडचणी वाढल्या आहे.

bjp leaders clash in front of deputy cm keshav rasad Maurya | Video - तुफान राडा! उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासमोरच भाजपा नेते आपापसात भिडले

Video - तुफान राडा! उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासमोरच भाजपा नेते आपापसात भिडले

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत भाजपा नेत्यांमध्ये झालेल्या वादाने पक्षाच्या अडचणी वाढल्या आहे. हे प्रकरण गोसाईगंजचे माजी आमदार इंद्र प्रताप तिवारी उर्फ खब्बू यांच्या आईच्या निधनानंतर आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेतील आहे. या कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पोहोचलेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या समोरच भाजपा जिल्हाध्यक्ष संजीव सिंह आणि नेते सच्चिदानंद पांडे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.

प्रत्यक्षदर्शींने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये सुरुवातीला एका विषयावरून शाब्दिक चकमक झाली. काही क्षणांतच हा वाद इतका वाढला की, त्याचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. सार्वजनिक कार्यक्रमात दोन्ही नेते अशा प्रकारे आपापसात भिडल्याने तिथे उपस्थित सर्वांनाच मोठा धक्का बसला. 

वादादरम्यान व्यासपीठ आणि कार्यक्रम स्थळी उपस्थित असलेल्या लोकांसमोर शिष्टाचाराच्या सर्व मर्यादा पायदळी तुडवल्या गेल्याचं दिसून आलं. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की उपमुख्यमंत्र्यांच्या अंगरक्षकांना मध्यस्थी करावी लागली. अंगरक्षकांनी दोन्ही नेत्यांना बाजूला करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

या वादादरम्यान दोन्ही नेते एकमेकांना ढकलत शाळेतील मुलांप्रमाणे भांडताना दिसले. ही संपूर्ण घटना तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड केली. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे सच्चिदानंद पांडे यांनी यापूर्वी बसपाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूकही लढवली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घडलेल्या या घटनेमुळे केवळ कार्यक्रमाला धक्का बसला नाही, तर पक्षाच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या राजकीय वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. व्हायरल व्हिडिओमुळे हे प्रकरण अधिकच तापलं असून भाजपामधील शिस्तीबाबत आता चर्चा होऊ लागली आहे.

Web Title : उपमुख्यमंत्री मौर्य के सामने यूपी भाजपा नेताओं में हिंसक झड़प

Web Summary : उत्तर प्रदेश में उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य के सामने भाजपा नेता आपस में भिड़ गए। एक शोकसभा में जिला अध्यक्ष संजीव सिंह और नेता सच्चिदानंद पांडे के बीच तीखी नोकझोंक हुई, जो हाथापाई में बदल गई। इस घटना से पार्टी की छवि पर सवाल उठे हैं और वीडियो वायरल हो रहा है।

Web Title : UP BJP Leaders Clash Violently Before Deputy CM Maurya

Web Summary : In Uttar Pradesh, BJP leaders clashed before Deputy CM Keshav Prasad Maurya during a memorial. A verbal argument escalated into a physical altercation between district president Sanjeev Singh and leader Sachchidanand Pandey, disrupting the event and raising questions about party discipline. The video went viral.