BJP leaders advise leaders of the state not to comment on the government, including Ranane | राणेंसह राज्यातील नेत्यांना सरकारबाबत भाष्य न करण्याचा भाजप नेतृत्वाचा सल्ला
राणेंसह राज्यातील नेत्यांना सरकारबाबत भाष्य न करण्याचा भाजप नेतृत्वाचा सल्ला

संतोष ठाकूर 
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याबाबत भाष्य करू नये, असा सल्ला भाजप नेतृत्वाने राज्यातील सर्व नेत्यांना दिला आहे. तोडफोड करून भाजप राज्यात सरकार स्थापन करू पाहत आहे, असे संकेत जाऊ नयेत म्हणून महाराष्टÑातील भाजपच्या सर्व नेत्यांना कोणतेही भाष्य न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या नेत्यांत नारायण राणे यांचाही समावेश आहे.
राज्यात भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करीन, असे विधान राज्यसभेतील खासदार नारायण राणे यांनी अलीकडेच केले होते. सरकार स्थापन करण्यांसदर्भात केंद्रीय नेतृत्वाच्या सल्ल्यानंतरच बोलावे, असे एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. राष्टÑपती राजवटीदरम्यान विरोधी पक्षांना सरकार स्थापन करू शकतो, असे वाटल्यास ते पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना दाखवून कधीही सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकतात. त्यानंतरच त्यांना सरकार स्थापन करण्याची संधी मिळेल. आम्ही कोणत्याही पक्षाशी किंवा कोणत्याही आमदाराच्या संपर्कात नाही. तथापि, हे खरे आहे की, अनेक आमदारांना वाटते की, भाजपने सरकार स्थापन करावे आणि त्यासाठी सहकार्य देण्याची त्यांची तयारी आहे. विरोधी पक्षांची सरकार स्थापन करण्याच्या संधीचा वापर जरूर करावा, असे आमचे म्हणणे आहे.
विरोधी पक्षांना सरकार स्थापन करण्यास अपयश आल्यास भाजप नव्याने प्रयत्न करणार की, स्पष्ट बहुमतासाठी नव्याने निवडणुकीला सामोरे जाणे पसंत करील? या प्रश्नावर या पदाधिकाºयाने सांगितले की, हा भविष्यातील मुद्दा आहे.

Web Title: BJP leaders advise leaders of the state not to comment on the government, including Ranane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.