शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

सुब्रमण्यम स्वामींचा राहुल गांधींवर निशाणा; म्हणाले, "शेतकरी आंदोलनासाठी बोलावत होते पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 4:57 PM

Subramanian Swamy : राहुल गांधींच्या इटली दौऱ्यावरून सुब्रमण्यम स्वामींची टीका

ठळक मुद्देराहुल बाबांना आजीची आठवण आली, सुब्रमण्यम स्वामींचा हल्लाबोल

देशात कृषी कायद्यांविरोधात महिन्याभरापासून शेतकऱ्यांचं आदोलन सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी हे सध्या परदेशी रवाना झाले आहेत. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी राहुल गांधी वैयक्तीक कारणांमुळे परदेशात गेले असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर भाजपानं त्यांच्यावर निशाणा साधला होता. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधी यांच्या या परदेश दौऱ्यावर निशाणा साधला आहे. "शेतकरी म्हणतात राहुल बाबांना शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यास सांगण्यात आलं होतं. परंतु राहुल बाबांना आजीची आठवण आली," असं म्हणत सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींवर टीका केली. यापूर्वी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनीदेखील राहुल गांधींवर निशाणा साधला होता.  "एकीकडे काँग्रेस आपला १३६ वा स्थापना दिवस साजरा करत आहे आणि दुसरीकडे राहुल गांधी '९ २ ११' झाले," असं शिवराज सिंग चौहान म्हणाले होते. तर दुसरीकडे त्यांच्या परदेशवारीवरून सोशल मीडियावरीही लोकांनी टीका केली होती. जर काँग्रेसनं शेतकरी आंदोलनाला समर्थन दिलं आहे तर त्यांनी देशात राहून त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे, असं काही जणांनी म्हटलं होतं. नुकताच काँग्रेसचा १३६ वा स्थापना दिवस पार पडला. यावेळी काँग्रेसच्या मुख्यालयावर पक्षाचा झेंडा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एके. अँटनी यांनी फडकावला. यादरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव केसी वेणुगोपाल यांनी राहुल गांधी आपल्या आजीला भेटण्यासाठी इटलीला गेले असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच यात काही चुकीचं नसून प्रत्येकाला आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा हक्क असल्याचंही ते म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीBJPभाजपाcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीFarmer strikeशेतकरी संप