शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

जगाची चिंता हा देखावा, केजरीवाल केवळ स्वत:चा विचार करतात; संबित पात्रांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 15:57 IST

मोफतच्या योजना देशाला आर्थिक विनाशाकडे घेऊन जाऊ शकतात, असं न्यायालयानं म्हटलं होतं.

FreeschemesSupremeCourt: निवडणुकीदरम्यान मोफत सुविधा देण्याचे आश्वासन देणाऱ्या राजकीय पक्षांची मान्यता रद्द करण्यात यावी, अशाप्रकारची याचिका भाजपकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली, यावेळी सर्वोच्च न्यायालयाने देशात सुरू असलेल्या मोफतच्या योजनांवर(फ्री कल्चर) चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, आता यावरून राजकारण तापू लागलं आहे. भाजपते राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला.

अरविंद केजरीवाल मोफत गोष्टी वाटतात कारण त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण व्हाव्यात. आपल्याला संपूर्ण जगाची चिंता आहे असं ते दाखवतात, परंतु असं बिलकुल नसल्याचं पात्रा म्हणाले. ”देशात आम आदमी आणि अरविंद केजरीवाल यांची प्रतिष्ठा निर्माण व्हावी हेच त्यांचं टार्गेट आहे. त्यांना आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करायच्या आहेत. यामुळेच ते दिवसेंदिवस खोटं बोलत आहे,” असंही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी फ्रिबीज आणि वेलेफेअर स्किममध्ये फरक असल्याचं म्हटलं. वेलफेअर एक टार्गेट समुहाला दिलं जातं. ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधारणा होऊ शकतील. फ्रिबीजकडून देशाला कोणालाही दूरवर फायदा होत नसल्याचंही पात्रा यांनी स्पष्ट केलं. “८० लाख कुटुंबांना अन्न पुरवणं हे वेलफेअर आहे. केजरीवाल फक्त मी, माझं आणि माझं कुटुंब यांचाच फायदा पाहतात. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात टार्गेट योजनांमुळे दारिद्र्य रेषेखाली लोकांची संख्या कमी झाली आहे,” असंही ते म्हणाले.आर्थिक विनाशाकडे नेणारसुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटलं की, 'मोफतच्या योजना देशाला आर्थिक विनाशाकडे घेऊन जाऊ शकतात. मोफत योजनांचा कोणालाही दीर्घकालीन फायदा होणार नाही.' केंद्र सरकारच्या वतीने युक्तिवाद करताना सॉलिसिटर जनरल म्हणाले की, 'अशाच प्रकारच्या मोफत घोषणा देशाला आर्थिक विनाशाकडे घेऊन जातील. जोपर्यंत सरकार याबाबत कायदा आणत नाही, तोपर्यंत न्यायालयाने हस्तक्षेप करून मार्गदर्शक तत्त्वे ठरवून द्यावीत.'

टॅग्स :Sambit Patraसंबित पात्राNarendra Modiनरेंद्र मोदीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल