शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

जया बच्चनसंदर्भात वादग्रस्त विधानानंतर चौफेर टीका, भाजपा नेता नरेश अग्रवाल यांनी व्यक्त केला खेद  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 11:23 AM

समाजवादी पार्टीतून भाजपा प्रवेश केल्यानंतर नरेश अग्रवाल यांनी नेत्या व अभिनेत्री जया बच्चन यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली.

नवी दिल्ली - समाजवादी पार्टीला सोडचिठ्ठी देऊन भाजपा प्रवेश केल्यानंतर नरेश अग्रवाल यांनी नेत्या व अभिनेत्री जया बच्चन यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली. सर्व स्तरातून शाब्दिक फटकार मिळाल्यानंतर नरेश अग्रवाल यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी खेद व्यक्त केला.  समाजवादी पार्टीकडून राज्यसभेवर न पाठवल्यामुळे नाराज झालेल्या नरेश अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजपात प्रवेश केल्यानंतर नरेश अग्रवाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ''मी भाजपात प्रवेश करत आहे. राष्ट्रीय पक्षामध्ये न राहता देशासमोर स्वतःची भूमिका ठेवता येणार नाही असं ते म्हणाले. तसंच समाजवादी पक्षाविरोधात राग व्यक्त करताना सिनेमामध्ये नाचणा-यांसाठी माझं तिकीट कापलं'', असे वादग्रस्त विधान त्यांनी केले. 

समाजवादी पक्षाने नरेश अग्रवाल आणि किरणमय नंदा यांना डावलून जया बच्चन यांना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी दिली होती. दुसरीकडे, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नरेश अग्रवाल यांचं स्वागत केलं. पण त्याचसोबत त्यांनी जया बच्चन यांच्याबाबत केलेल्या टीकेचं कधीही समर्थन होऊ शकत नाही, असंही स्पष्ट केले.  

अग्रवाल यांनी व्यक्त केला खेद दरम्यान, मंगळवारी अग्रवाल यांनी जया बच्चन यांच्यासंदर्भात केलेले वादग्रस्त विधानाप्रकरणी चौफेर टीका झाल्यानंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ''माझ्या विधानामुळे कोणापुढे कोणतीही समस्या निर्माण झाली असल्यास मी त्याबाबत खेद व्यक्त करतो. समाजवादी पार्टीला मला तिकीट देणं योग्य वाटले नाही आणि त्यांनी जया यांना तिकीट दिलं. मला कोणत्याही वादामध्ये अडकायचे नाही आणि मी केलेल्या विधानाप्रकरणी खेद व्यक्त करतो''. 

''माझ्या विधानाचा प्रसिद्धी माध्यमांनी वेगळ्या पद्धतीनं दाखवलं. मला कोणाला दुःख पोहोचवण्याचा हेतू नव्हता. मी माझे शब्द मागे घेतो'',असे पत्रकारांसोबत संवाद साधताना त्यांनी म्हटले आहे.  

 

 

 

टॅग्स :BJPभाजपाJaya Bachchanजया बच्चनSamajwadi Janata Party (National)समाजवादी जनता पार्टी (राष्ट्रीय)