शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

भाजप नेते मनोज तिवारी यांना जिवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 4:42 AM

दिल्ली भाजपचे अध्यक्ष आणि उत्तर पूर्व दिल्लीतील खासदार मनोज तिवारी यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर मॅसेज पाठवून त्यांना ही धमकी दिली आहे.

नवी दिल्ली : दिल्ली भाजपचे अध्यक्ष आणि उत्तर पूर्व दिल्लीतील खासदार मनोज तिवारी यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर मॅसेज पाठवून त्यांना ही धमकी दिली आहे.मनोज तिवारी यांना हा मॅसेज शुक्रवारी दुपारी पाठविण्यात आला होता. तिवारी यांनी तो मॅसेज शनिवारी पाहिला. मीडियाशी बोलताना तिवारी म्हणाले की, एका अज्ञात व्यक्तीने मला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. गरज भासल्यास पंतप्रधानांनाही संपवून टाकले जाईल, असेही या व्यक्तीने धमकीत म्हटले आहे. हिंदीमध्ये मॅसेज पाठविणाऱ्या या व्यक्तीने म्हटले आहे की, अतिशय नाइलाजाने तिवारी यांची हत्या करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. त्याबद्दल माफी असावी.दिल्ली पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांच्या निर्देशानुसार स्पेशल सेलच्या टीमने प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, एका अज्ञात व्यक्तीने दिल्ली भाजप मुख्यालय उडविण्याची धमकी शनिवारी दिली होती. अर्थात, काही वेळातच दिल्ली पोलिसांनी ८० वर्षांच्या एका आरोपीचा शोध लावला होता. फोन करणारा हा इसम कर्नाटकचा रहिवासी आहे........

टॅग्स :Manoj Kumarमनोज कुमारBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश