भाजप नेते मनोज तिवारी यांना जिवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 04:42 IST2019-06-24T04:42:07+5:302019-06-24T04:42:40+5:30

दिल्ली भाजपचे अध्यक्ष आणि उत्तर पूर्व दिल्लीतील खासदार मनोज तिवारी यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर मॅसेज पाठवून त्यांना ही धमकी दिली आहे.

 BJP leader Manoj Tiwari threatens to kill | भाजप नेते मनोज तिवारी यांना जिवे मारण्याची धमकी

भाजप नेते मनोज तिवारी यांना जिवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली : दिल्ली भाजपचे अध्यक्ष आणि उत्तर पूर्व दिल्लीतील खासदार मनोज तिवारी यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर मॅसेज पाठवून त्यांना ही धमकी दिली आहे.
मनोज तिवारी यांना हा मॅसेज शुक्रवारी दुपारी पाठविण्यात आला होता. तिवारी यांनी तो मॅसेज शनिवारी पाहिला. मीडियाशी बोलताना तिवारी म्हणाले की, एका अज्ञात व्यक्तीने मला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. गरज भासल्यास पंतप्रधानांनाही संपवून टाकले जाईल, असेही या व्यक्तीने धमकीत म्हटले आहे. हिंदीमध्ये मॅसेज पाठविणाऱ्या या व्यक्तीने म्हटले आहे की, अतिशय नाइलाजाने तिवारी यांची हत्या करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. त्याबद्दल माफी असावी.


दिल्ली पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांच्या निर्देशानुसार स्पेशल सेलच्या टीमने प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, एका अज्ञात व्यक्तीने दिल्ली भाजप मुख्यालय उडविण्याची धमकी शनिवारी दिली होती. अर्थात, काही वेळातच दिल्ली पोलिसांनी ८० वर्षांच्या एका आरोपीचा शोध लावला होता. फोन करणारा हा इसम कर्नाटकचा रहिवासी आहे.
.......

Web Title:  BJP leader Manoj Tiwari threatens to kill