शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ही सनातन धर्म नष्ट करण्याची राजकीय रणनीती आहे का? उदयनिधींच्या वक्तव्यावर नड्डांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 18:56 IST

उदयनीधि स्टॅलिन यांनी कथितपणे म्हटले आहे की, आपण ज्या पद्धतीने डेंग्यू आणि मलेरिया संपवतो, त्याच पद्धतीने सनातनही नष्ट करा. 

भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री तथा डीएमके चीफ एमके स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्मासंदर्भातील वक्तव्यावरून जोरदार हल्ला चढवला आहे. ''ही सनातन धर्म नष्ट करण्याची त्यांची राजकीय रणनीती आहे का?'' असा सवाल नड्डा यांनी केला आहे. ते मध्य प्रदेशातील चित्रकूटमध्ये 'जन आशीर्वाद यात्रेत' लोकांना संबोधित करत होते.

तत्पूर्वी, उदयनीधि स्टॅलिन यांनी कथितपणे म्हटले आहे की, आपण ज्या पद्धतीने डेंग्यू आणि मलेरिया संपवतो, त्याच पद्धतीने सनातनही नष्ट करा. 

नड्डा म्हणाले, आज मध्य प्रदेश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. स्वच्छतेच्या बाबतीत राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. स्मार्ट सिटी आणि प्रधानमंत्री स्वामीत्व योजनेतही राज्य आघाडीवर आहे. भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येईल, हीच आमची हमी, हीच पंतप्रधान मोदींचीही गॅरंटी आहे.

भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या देशेने एनडीएची वाटचाल -  विरोधकांच्या आघाडीवर निशाना साधताना जेपी नड्डा म्हणाले, "पीएम मोदींच्या मार्गदर्शनात एनडीए आघाडी भारताला एक विकसित राष्ट्र बनविण्यासाठी काम करत आहे. एकीकडे भारत चंद्र आणि सूर्याला जिंकण्याच्या कामात लागला आहे. तर दुसरीकडे, जेव्हा पहिल्यांदाच जी20 मध्ये सहभागी होण्यासाठी जगातील सर्वात शक्तीशाली लोक येत आहेत. तेव्हा इंडिया आघाडी आपली संस्कृती आणि धर्माला नुकसान पोहोचविण्याचे काम करत आहे. ही I.N.D.I.A आघाडी आहे की, 'घमंडिया' आघाडी," असा सवालही नड्डा यांनी यावेळी केला. 

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाMadhya Pradeshमध्य प्रदेशNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपा