bjp leader guftar ahmed will start roza for home minister amit shah health | 'अमित शहा बरे होईपर्यंत रोजा ठेवणार'; जम्मू काश्मीरमधील मुस्लिम नेत्याचा निर्धार

'अमित शहा बरे होईपर्यंत रोजा ठेवणार'; जम्मू काश्मीरमधील मुस्लिम नेत्याचा निर्धार

नवी दिल्ली:  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमित शहा यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली. कोरोनाची काही प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर शहांनी टेस्ट केली होती, त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अमित शहा यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. 

अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर देशभरातून तब्येत ठीक व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. मात्र जम्मू- काश्मीरमधील भाजपाचे नेते गुफ्तार अहमद यांनी देखील अमित शहा यांच्यासाठी रोजा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत रोजा ठेवणार असल्याचं  गुफ्तार अहमद यांनी म्हटलं आहे. अमित शहा यांना बरं वाटावं म्हणून अल्लाकडे प्रार्थना करतो असं गुफ्तार अहमद यांनी ट्विटरवर व्हिडिओद्वारे सांगितले.

कोरोनाची काही प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर अमित शहांनी टेस्ट केली होती, त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. "रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून माझी तब्येत ठीक आहे. डॉक्टर्सच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागील काही काळात माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी तात्काळ स्वत:ला आयसोलेट करुन कोरोना टेस्ट करावी" असं आवाहन अमित शहा यांनी केलं होतं.

दरम्यान, देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना, रविवारी (2 जुलै) भाजपच्या पाच मोठ्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर उत्तर प्रदेशातील कॅबिनेट मंत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये अमित शहांसह कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, भाजपचे यूपी प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव आणि उत्तर प्रदेशचे जलशक्ती मंत्री महेंद्र सिंह यांचा समावेश आहे.

इतर महत्वाच्या बातम्या- 

अत्यावश्यक सेवेतील लोकललाही पावसाचा फटका; जाणून घ्या पश्चिम,मध्य अन् हार्बर रेल्वेची स्थिती

...अन्यथा आम्ही त्यांना ठोकून काढणार; मनसेचा ठाकरे सरकारला इशारा

तडीपारीची नोटीस आलेल्या अविनाश जाधव यांना राज ठाकरेंनी पाठवला खास निरोप; म्हणाले...

Dr Aishaचा कोरोनामुळे मृत्यू?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल फोटो, व्हिडिओमागचं सत्य

'माझ्या विरोधात मोठं षडयंत्र'; अविनाश जाधव यांनी CCTV व्हिडिओद्वारे सादर केला पुरावा

...तर आता आमच्या स्टाईलने चोप देऊ; 'खळ्ळ-खॅटक'वाल्या मनसेला शिवसेनेचा इशारा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bjp leader guftar ahmed will start roza for home minister amit shah health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.