MNS LeaderAvinash Jadhav has claimed that the complaint filed by Thane Municipal Corporation is false | 'माझ्या विरोधात मोठं षडयंत्र'; अविनाश जाधव यांनी CCTV व्हिडिओद्वारे सादर केला पुरावा

'माझ्या विरोधात मोठं षडयंत्र'; अविनाश जाधव यांनी CCTV व्हिडिओद्वारे सादर केला पुरावा

मुंबई: मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांकडून २ वर्ष हद्दपार होण्याची नोटीस बजावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अविनाश जाधव विविध प्रश्नांवर आंदोलन करुन सरकारवर टीकास्त्र सोडत आहे. ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या मुलींना काढल्याप्रकरणी मनसेकडून शुक्रवारी ठाणे महापालिकेसमोर आंदोलन सुरु होतं. हे आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. यानंतर न्यायालयाने अविनाश जाधव यांना ३ ऑगस्टपर्यत पोलीस  कोठडीत राहण्याचे आदेश दिले आहे. 

...तर आता आमच्या स्टाईलने चोप देऊ; 'खळ्ळ-खॅटक'वाल्या मनसेला शिवसेनेचा इशारा

अविनाथ जाधव यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तसेच अविनाश जाधव यांनी ठाणे महानगपालिकेने दाखल केलेली तक्रार खोटी असल्याचा दावा केला आहे. महापालिकेने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत अविनाश जाधव यांनी महापालिकेच्या गेटजवळ असलेल्या सुरक्षारक्षकांना शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे. मात्र अविनाश जाधव यांनी साधर केलेल्या CCTV व्हिडिओमध्ये त्यांची गाडी गेटजवळ थांबलीच नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गाडी गेटजवळ थांबलीच नाही मग मी कोणाल्या शिव्या दिल्या, असा सवाल अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे.

तडीपारीची नोटीस आलेल्या अविनाश जाधव यांना राज ठाकरेंनी पाठवला खास निरोप; म्हणाले..

Dr Aishaचा कोरोनामुळे मृत्यू?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल फोटो, व्हिडिओमागचं सत्य

अविनाश जाधव फेसबुकद्वारे म्हणाले की, त्याचे मी काही पुरावे ही देतो. मी नर्सेससाठी केलेल्या आंदोलनात माझ्यावर केलेले गुन्हे हे खोटे आहेत, ते तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यावर कळेल,  सत्ताधारी माझ्या विरोधात मोठं षडयंत्र रचत आहेत. मला आपल्या सगळ्यांचा पाठिंबा हवा आहे, असं अविनाश जाधव यांनी सांगितले.मला अडकवण्याचा प्रयत्न होतोय हे मी सातत्याने सांगतोय.. त्याचे मी काही पुरावे ही देतोय मी नर्सेस साठी केलेल्या आंदोलनात...

Posted by Avinash Jadhav MNS on Sunday, 2 August 2020

दरम्यान, ठाणे महापालिकेसमोर आंदोलन करताना अविनाश जाधव यांना पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली होती. या नोटीसनंतर अविनाश जाधव म्हणाले की, याबाबत बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, मागची अनेक वर्ष लोकांसाठी आंदोलन करतोय, स्वत:साठी आंदोलन केले नाही, आजही विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या मुलांसाठी ठाणे महापालिकेसमोर आंदोलन करताना त्यांना ही नोटीस प्राप्त झाली आहे. या नोटिशीमध्ये मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यातून हद्दपार होण्यासं सांगितलं आहे. जिल्ह्यात इतके गुंड आहेत त्यांना अशी नोटीस कधी बजावली नाही, लोकांसाठी आंदोलन करताना अशाप्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे असा आरोप तअविनाश जाधव यांनी केला आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: MNS LeaderAvinash Jadhav has claimed that the complaint filed by Thane Municipal Corporation is false

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.