'ज्यांनी क्लास मॉनिटरची निवडणूक लढवली नाही ते पक्ष हाताळताहेत'; गौरव वल्लभ यांची जयराम रमेश यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 04:00 PM2024-04-07T16:00:12+5:302024-04-07T16:00:30+5:30

गौरव वल्लभ यांनी काही दिवसापूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

bjp leader Gaurav Vallabh criticizes congress leader Jairam Ramesh | 'ज्यांनी क्लास मॉनिटरची निवडणूक लढवली नाही ते पक्ष हाताळताहेत'; गौरव वल्लभ यांची जयराम रमेश यांच्यावर टीका

'ज्यांनी क्लास मॉनिटरची निवडणूक लढवली नाही ते पक्ष हाताळताहेत'; गौरव वल्लभ यांची जयराम रमेश यांच्यावर टीका

गौरव वल्लभ यांनी काही दिवसापूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला. गौरव वल्लभ यांनी आज काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांच्यावर निशाणा साधला. 'ज्यांनी कधीही क्लास मॉनिटरची निवडणूकही लढवली नाही ते आता पक्ष हाताळत आहेत', अशी टीका गौरव वल्लभ यांनी केली. 

गौरव वल्लभ यांनी सुरुवातीला जयराम रमेश यांचे नाव न घेता टीका केली. "मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा ४२ खासदार होते. नवीन विचारांना चालना मिळेल, या विचाराने मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, पण असे काहीही झाले नाही. गेल्या ३० वर्षांपासून काँग्रेसचा जाहीरनामा हाच आहे. एक व्यक्ती तो तयार करत आहे, जर त्या व्यक्तीचे विचार ठाम असते तर आज पक्षाची ही अवस्था झाली नसती, असा टोलाही गौरव वल्लभ यांनी लगावला.

ओडिशात भाजपाला धक्का, उपाध्यक्ष लेखश्री सामंतसिंघार यांचा बीजेडीमध्ये प्रवेश

काँग्रेसचे माजी प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी सांगितले की, अर्थसंकल्पानंतर पत्रकार परिषद घेण्यास सांगितले होते, पण तसे करण्यास नकार दिला आणि जोपर्यंत काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्व अयोध्येतील राम मंदिराला भेट देत नाही, तोपर्यंत पत्रकार परिषद घेणार नसल्याचे सांगितले. 

गौरव वल्लभ म्हणाले की, पक्ष आता माजी केंद्रीय मंत्र्यांचे पीए हाताळत आहेत. पीएला निवडणूक कशी लढवायची हे माहित नाही. उत्तर प्रदेश आणि बिहार ही वेगवेगळी राज्ये आहेत हे त्यांना कदाचित माहीत नसेल. असे त्यांना विचारले तर ते गोंधळून जातील. जर तुम्ही त्यांना जालोरे, सरोही कुठे आहेत असे विचारले तर ते कदाचित मध्य प्रदेश म्हणतील. हे त्यांचे ज्ञान आहे. अशा नेत्यांचे ग्राउंड कनेक्शन खूपच कमकुवत आहे, असंही गौरव वल्लभ म्हणाले.

“मी कॉलेजमध्ये असताना ती व्यक्ती काही वर्षांपूर्वी काँग्रेसची प्रवक्ता होती, आता ती संपर्क कक्षाची प्रमुख आहे. त्यांना काँग्रेसच्या विचारसरणीत रस नाही. त्यांना फक्त त्यांची राज्यसभेची जागा राखण्यात रस आहे, अशी टीकाही गौरव वल्लभ यांनी केली.

Web Title: bjp leader Gaurav Vallabh criticizes congress leader Jairam Ramesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.