दिल्लीत भाजप नेत्याची आत्महत्या, गार्डनमध्ये आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 11:39 IST2021-03-30T11:38:15+5:302021-03-30T11:39:48+5:30

जीएस बावा (58) हे पश्चिम दिल्लीच्या फतेह नगर येथे राहत होते. होळीदिवशी सायंकाळी 6 वाजता सुभाषनगर येथील एका बगीचामध्ये जीएस बावा यांचा मृतदेह ग्रीलला लटकल्याचे आढळून आले

BJP leader commits suicide in Delhi, body found in garden | दिल्लीत भाजप नेत्याची आत्महत्या, गार्डनमध्ये आढळला मृतदेह

दिल्लीत भाजप नेत्याची आत्महत्या, गार्डनमध्ये आढळला मृतदेह

ठळक मुद्देजीएस बावा (58) हे पश्चिम दिल्लीच्या फतेह नगर येथे राहत होते. होळीदिवशी सायंकाळी 6 वाजता सुभाषनगर येथील एका बगीचामध्ये जीएस बावा यांचा मृतदेह ग्रीलला लटकल्याचे आढळून आले.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील एका भाजपा नेत्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पश्चिम दिल्ली भाजपाचे माजी उपाध्यक्ष जीएस बावा असे त्यांचे नाव असून घराशेजारील एका बगीचामध्ये त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळून आला. अद्याप आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही. मात्र, घरगुती भांडणातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

जीएस बावा (58) हे पश्चिम दिल्लीच्या फतेह नगर येथे राहत होते. होळीदिवशी सायंकाळी 6 वाजता सुभाषनगर येथील एका बगीचामध्ये जीएस बावा यांचा मृतदेह ग्रीलला लटकल्याचे आढळून आले. त्यानंतर, स्थानिकांना जवळील पोलीस ठाण्यात यासंदर्भात माहिती दिली. घटनेची माहितीच मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. तपासणीनंतर ही व्यक्ती भाजपा नेते जीएस बावा असल्याचं निष्पन्न झालं. मृतदेहाजवळ पोलिसांना कुठलिही सुसाईड नोट आढळून आली नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील अधिक तपास सुरू आहे.   
 

Web Title: BJP leader commits suicide in Delhi, body found in garden