शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

भाजपा नेते अरुण जेटली आता खासगी निवासस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 4:37 AM

बहुतेक नेत्यांना जन्मभर सरकारी सुख-सुविधांचा लाभ मिळावा, असे वाटते; परंतु ...

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : बहुतेक नेत्यांना जन्मभर सरकारी सुख-सुविधांचा लाभ मिळावा, असे वाटते; परंतु भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मात्र स्वत:ला वेगळे सिद्ध केले आहे. प्रकृती बरी राहत नसल्यामुळे जेटली यांनी मोदी सरकारमध्ये मंत्रीपद घ्यायला नकार दिल्यानंतर त्यांनी ते राज्यसभेचे सदस्य असूनही सरकारी निवासस्थान स्वेच्छेने सोडले आहे.जेटली अर्थमंत्री म्हणून दिला गेलेला दोन, कृष्ण मेनन मार्गावरील बंगला रिकामा करून आपल्या कैलास कॉलनीतील खासगी निवासस्थानी राहायला गेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी यांनी जेटली यांना उपचारांदरम्यान सरकारी निवासस्थान घेण्याचा आग्रहही केला होता. मोदी तर एवढेही म्हणाले की, एक सल्लागार म्हणून मला त्यांची गरज आहे. त्यांनी बिनखात्याचे मंत्री म्हणून राहावे, असेही म्हटले गेले होते; परंतु जेटली यांनी त्याला नकार दिला व ठरवून सरकारी निवासस्थान सोडले.

२०१८ मध्ये राज्यसभेचे सदस्य बनल्यानंतर जेटली यांचा कार्यकाळ २०२४ पर्यंत आहे. नियमांनुसार ते या सुविधा वापरू शकतात. निवडणुकीत प्रकृती बरी नसतानाही जेटली यांनी भाजपच्या प्रमुख रणनीतिकाराची भूमिका पार पाडली. निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही जेटली यांनी सरकार स्थापन व्हायच्या आधीच मोदी यांना माझा मंत्रिमंडळात समावेश करू नका, असा आग्रह पत्र लिहून केला.स्मारकांना प्रोत्साहन नाहीमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्यानंतर ६, कृष्ण मेनन मार्गावरील त्यांच्या निवासस्थानाला स्मारक बनवण्याची मागणीही भाजपने फेटाळली. नेत्यांचे स्मारक बनवण्याच्या परंपरेला प्रोत्साहन न देण्याच्या धोरणाचे पालन करताना मोदी सरकारने चौधरी चरण सिंह आणि बाबू जगजीवन राम यांच्या स्मारकांनाही मंजुरी दिली नव्हती.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीBJPभाजपा