राजस्थानमध्ये विधानसभा जिंकण्यासाठी भाजपने आखला 'नवीन डाव'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 16:54 IST2018-10-17T16:53:39+5:302018-10-17T16:54:56+5:30
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांना भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांच्या नकारात्मकेताचा सामना करावा लागत आहे. कारण, 2003 ते 2005 या कालावधीत राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून वसुंधराराजे यांची वर्णी लागली होती.

राजस्थानमध्ये विधानसभा जिंकण्यासाठी भाजपने आखला 'नवीन डाव'
जयपूर - राजस्थानमधीलविधानसभा निवडणुकांमध्ये विजयी होण्यासाठी भाजपकडून रणनिती आखण्यात आली आहे. त्यानुसार, कोरी पाटी या तत्वानुसार भाजपकडून 100 नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपचा डाव आहे. अँटी इन्कंबन्सी लक्षात घेऊन भाजपने राजस्थानमधील विधानसभेच्या 200 जागांपैकी 100 जागांवर नवीन उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांना भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांच्या नकारात्मकेताचा सामना करावा लागत आहे. कारण, 2003 ते 2005 या कालावधीत राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून वसुंधराराजे यांची वर्णी लागली होती. त्यानंतर 2013 पासून वसुंधराराजे यांच्याकडेच राजस्थानची जबाबदारी आहे. त्यामुळे अँटी इन्कम्बन्सीचा फटका राजे यांना बसण्याची शक्यता आहे. तसेच राजस्थान सरकारमधील मंत्री गुलाबचंद्र कटारिया, मंत्री सुरेंद्र गोयल, युनुस खान आणि राजकुमार रिनवा या मंत्र्यांनाही वाढता विरोध आहे. त्यामुळे या मंत्र्यांना बाजूला बसविण्यात येऊ शकते.
भाजपने 2008 मध्ये 68 उमेदवारांना तिकीट दिले होते. त्याच, उमेदवारांना 2003 मध्येही उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, या 68 उमेदवारांपैकी केवळ 28 जणांनाच विजय मिळाला होता. तर पराभूत उमेदवारांमध्ये 40 आमदार आणि 13 विद्यमान मंत्र्यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे 2013 च्या निवडणुकीतही भाजपने 2008 मधीलच 105 उमेदवारांना संधी होती. मात्र, तेव्हाही केवळ 14 उमेदवारांनाच निवडणूक जिंकला आली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जोखीम न उचलता, नवख्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपचा डाव आहे.