शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
2
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
3
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
4
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
5
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
6
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
7
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
8
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
9
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
10
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
11
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
12
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
13
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
14
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
15
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
16
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
17
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
18
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
19
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
20
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

2019च्या लोकसभा निवडणुकीत यूपीतल्या 80 जागा भाजपासाठी निर्णायक, संघाच्या अहवालावर ठरणार रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 10:35 IST

उत्तर प्रदेशमधल्या लोकसभेच्या 80 जागा या केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी निर्णायक भूमिका बजावत असतात.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधल्या लोकसभेच्या 80 जागा या केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी निर्णायक भूमिका बजावत असतात.भाजपा आणि संघ परिवार पुन्हा एकदा 2014चा करिश्मा आजमावण्यासाठी सज्ज झाला आहे. भाजपा आणि संघ परिवार लोकसभेच्या सर्व जागांची चाचपणी करत आहे.

बंगळुरू- उत्तर प्रदेशमधल्या लोकसभेच्या 80 जागा या केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी निर्णायक भूमिका बजावत असतात. गेल्या वेळी उत्तर प्रदेशमधून भाजपानं 71 खासदार निवडून आणले होते. त्यामुळे त्यांना केंद्रात सत्ता बनवता आलं. त्यामुळे भाजपा आणि संघ परिवार पुन्हा एकदा 2014चा करिश्मा आजमावण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून भाजपा आणि संघ परिवार लोकसभेच्या सर्व जागांची चाचपणी करत आहे. भाजपाच्या योजनेंतर्गत लोकसभेच्या भागातील नेते आणि कार्यकर्त्यांना लोकांमध्ये कुठल्या मुद्द्यांची जास्त चर्चा आहे, याची माहिती घ्यायला सांगितली आहे.तसेच ग्राऊंड झिरोचा अहवाल एकत्र करून रणनीती आखण्याचीही भाजपाची योजना आहे. गुजरातचे माजी गृहमंत्री गोरधन झडफिया हे नियुक्त रणनीतीचा एक भाग आहेत. भाजपाच्या नेत्यांनी उत्तर प्रदेशमध्ये सक्रिय कार्यकर्ते आणि नेत्यांनी एकमेकांमधील मतभेद विसरून एकत्र येण्याचा आदेशही दिला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडून पक्षातील असंतुष्ट नेत्यांना समजावण्याचा प्रयत्नही होऊ शकतो. उत्तर प्रदेशमध्ये देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे 80 लोकसभेच्या जागा आहेत. 2014ला भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएनं 73 जागांवर विजय मिळवला होता. बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्या संभाव्य आघाडीनं होणारं नुकसान टाळण्यासाठी भाजपानं चांगलीच कंबर कसली आहे. संघ आणि विहिंप हेसुद्धा राम मंदिराच्या मुद्द्याबरोबरच या निवडणुकीसाठी सक्रिय झाले आहेत. भाजपानं गेल्या वेळी ज्या 71 जागांवर विजय मिळवला होता. त्या ठिकाणी संघाच्या प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे. संघाचे ते स्वयंसेवक खासदारांची कामगिरी आणि पुन्हा त्या जागेवरून विजय मिळवण्यासाठी गरजेच्या असलेल्या मूलभूत प्रश्नांची माहिती गोळा करत आहेत.या गोळा केलेल्या माहितीच्या आधारेच पुन्हा त्या विभागातील खासदारांना तिकीट दिलं जाणार आहे. संघाचे संयुक्त महासचिव कृष्ण गोपाल उत्तर प्रदेशच्या राजकीय हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. आरएसएस सर्व्हे करून भाजपाला जिंकण्यासाठी काय काय करण्याची गरज आहे, याची माहिती देणार आहे. मोदींची उत्तर प्रदेशमध्ये चांगली लोकप्रियता असली तरी त्यांना जोखीम पत्करायची नाही. त्यामुळेच त्यांनी वाराणसीमध्ये भाजपा नेते मोठ्या प्रमाणात तैनात केले आहेत.गुजरातच्या नवसारीतले भाजपा खासदार सी. आर. पाटीलही जास्त करून स्वतःचा आठवडा हा वाराणसीमध्ये प्रकल्पांच्या प्रगतीच्या देखरेखीसाठी देत आहेत. तसेच गाझिपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा, उत्तर प्रदेशचे भाजपा अध्यक्ष आणि चंदोलीचे खासदार महेंद्र नाथ पांडेयही वाराणसीमध्ये सक्रिय आहेत. भाजपाच्या झडफिया यांनी शेतकरी आणि मागासवर्गीयांसाठी भरपूर काम केलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह