शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला दिल्ली काबीज करण्याची संधी

By admin | Updated: September 6, 2014 03:23 IST

नायब राज्यपाल नजीब जंग यांनी राष्ट्रपतींकडे मागितल्याने विधानसभेत बहुमत नसताना देखील भाजपाला दिल्लीत सरकार स्थापनेची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली.

नायब राज्यपालांनी पाठविला राष्ट्रपतींना अहवाल
नवी दिल्ली : सर्वात मोठय़ा पक्षाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्याची परवानगी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी राष्ट्रपतींकडे मागितल्याने विधानसभेत बहुमत नसताना देखील भाजपाला दिल्लीत सरकार स्थापनेची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली. 
जंग यांनी राष्ट्रपतींना पाठविलेल्या अहवालात दिल्लीतील राजकीय परिस्थितीचे सविस्तर विश्लेषण केले असून, दिल्लीत निर्वाचित सरकार गरजेचे असल्याचे नमूद केले आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाच्या 49 दिवसांच्या सरकारने राजीनामा दिल्यानंतर येथे 17 फेब्रुवारीपासून राष्ट्रपती राजवट आहे. 
त्यानंतर कोणत्याही पक्षाने दिल्लीत सरकार स्थापनेचा दावा केलेला नसला तरी विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असल्याने भाजपाला निमंत्रण दिले जाऊ शकते. सर्व पर्यायांचा विचार करताना नव्याने निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी निर्वाचित सरकारची शक्यता पडताळून बघायला हवी, असे नायब राज्यपालांनी म्हटले आहे. 
सरकार स्थापनेसाठी निमंत्रण मिळाल्यास पार्टी त्यावर विचार करेल, असे दिल्ली भाजपाप्रमुख सतीश उपाध्याय म्हणाले. दिल्लीत घटक पक्ष अकाली दलाचा एक मिळून भाजपाचे 29 आमदार आहेत. सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाला आणखी पाच आमदारांची आवश्यकता आहे. भाजपाने 7क् सदस्यांच्या विधानसभेत 31 जागा जिंकल्या होत्या. परंतु तीन आमदार हर्षवर्धन, रमेश बिधुडी आणि परवेश वर्मा हे लोकसभेत विजयी झाल्याने आमदारांची संख्या 28 झाली आहे. या तिघांनी राजीनामा दिल्यामुळे सभागृहात सदस्यांची संख्या 67 झाली आहे. त्यानुसार भाजपाला बहुमतासाठी आणखी पाच आमदारांची आवश्यकता आहे. आम आदमी पार्टीकडे 28 आमदार आहेत. त्यांनी काँग्रेसच्या आठ आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले होते.
 
लवकरच निर्णय
दिल्लीत सरकार स्थापनेसंदर्भातील निर्णय भाजपा घेईल, असे गृहमंत्री राजनाथसिंह म्हणाले. भाजपाचे दिल्लीचे प्रभारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजनाथ यांच्याशी नॉर्थ ब्लॉक यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी बोलताना ही भूमिका मांडली.