शहरं
Join us  
Trending Stories
1
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
2
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
3
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
4
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
5
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
6
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
7
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
8
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
9
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
10
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
11
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
12
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
13
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
14
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
15
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
16
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
18
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
19
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
20
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा

भाजपने मित्रांना दिल्या १०० जागा; आतापर्यंत ४२४ उमेदवारांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 12:20 PM

आतापर्यंत ४२४ उमेदवारांची घोषणा; १९ जागांसाठी उमेदवार अद्याप ठरेना

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी ९ उमेदवारांची घोषणा केली. आतापर्यंत पक्षाने ४२४ उमेदवारांची घोषणा केली आहे. अद्याप पाच राज्यांमधील १९ मतदारसंघांसाठी नावे निश्चित करण्याचे काम सुरू आहे.

भाजप नेतृत्वाला या १९ जागांसाठी उमेदवार निवडण्यात जास्त वेळ लागत आहे. कारण, विरोधी पक्षांकडून या जागा हिसकावून घेण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. या १९ जागांपैकी दोन उत्तर प्रदेशातील (रायबरेली आणि कैसरगंज), सहा जागा महाराष्ट्रात, सात जागा पंजाबमध्ये आणि प्रत्येकी एक जागा जम्मू -काश्मीर (पुंछ-राजौरी-अनंतनाग) आणि पश्चिम बंगाल (डायमंड हार्बर) या आहेत. भाजप ५४३ पैकी ४४३ ते ४४४ जागा लढवणार आहे आणि मित्रपक्षांसाठी जवळपास १०० जागा सोडणार आहे. दोन वेळा खासदार राहिलेले आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी प्रतिनिधित्व केलेली पश्चिम बंगालमधील डायमंड हार्बर जागा हिसकावून घेण्यासाठी भाजप नेतृत्व उत्सुक आहे. 

प्रियांका गांधी यांना पराभूत करण्यासाठी ताकद लावणारजम्मू- काश्मिरात भाजपने २ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत आणि ते अनंतनागमधून स्वतःचा उमेदवार उभा करू शकतात, तर इतर दोन जागा सोडू शकतात. रायबरेलीच्या जागेसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर होण्याची भाजप वाट पाहत आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा पराभव करण्यासाठी भाजप आपली संपूर्ण ताकद लावेल. कैसरगंजमध्ये भाजप कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जागी त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला उमेदवारी देऊ शकते.

महाराष्ट्रात काय?महाराष्ट्रात भाजपने २४ नावांची घोषणा केली आहे आणि आणखी सहा उमेदवार ते उभे करू शकतात. पंजाबमध्ये भाजपने सहा जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. उर्वरित सात जागांसाठी पुढील आठवड्यात नावे जाहीर केली जातील.

अभिनेत्री किरण खेर यांचे तिकीट भाजपने कापले

नवी दिल्ली : भाजपने बुधवारी १०व्या यादीत नऊ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशातील ७, चंडीगड आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत चंद्रशेखर यांचे चिरंजीव नीरज शेखर यांना उत्तर प्रदेशच्या बलिया लोकसभा मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. येथून पक्षाचे खासदार असलेले वीरेंद्र सिंह मस्त यांना यावेळी तिकीट नाकारण्यात आले आहे. मंत्री जयवीर सिंह ठाकूर यांना विद्यमान खासदार डिंपल यादव यांच्या विरोधात उमेदवारी दिली. चंडीगडमधून दोनवेळा खासदार असलेल्या अभिनेत्री किरण खेर यांना पक्षाने उमेदवारी नाकारत, येथून नेते संजय टंडन यांना तिकीट दिले आहे.

टॅग्स :BJPभाजपाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४