शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

बंगालमधील भगवी लाट ममता बॅनर्जींसाठी धोक्याची घंटा, विधानसभेचे गणित बिघडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 3:17 PM

एकेकाळी डाव्यांचा आणि आता तृणमूलचा गड असलेल्या बंगालमध्ये भाजपाने मिळवलेल्या अभूतपूर्व यशाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. 

कोलकाता -  लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला. भाजपाच्या या यशामध्ये पश्चिम बंगालमधील कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. बंगालमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारत 18 जागा जिंकल्या. लोकसभेच्या निकालांचा विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतल्यास भाजपाने तब्बल 128 विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे एकेकाळी डाव्यांचा आणि आता तृणमूलचा गड असलेल्या बंगालमध्ये भाजपाने मिळवलेल्या अभूतपूर्व यशाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. 2011 मध्ये डाव्यांची सत्ता खालसा केल्यापासून बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व आहे. 2014 मध्ये भाजपाने तृणमूलसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी भाजपाला केवळ दोन जागांवर विजय मिळवता आला होता. तसेच अवघ्या 28 लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाला आघाडी मिळाली होती. मात्र यावेळी भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून, तब्बल 128 मतदारसंघात आघाडी घेतली आहे. दुसरीकडे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला यावेळी 42 पैकी  22 जागांवर समाधान मानावे लागले आहे. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी तृणमूलला 214 मतदारसंघात आघाडी होती. पुढे दोन वर्षांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने 211 जागा जिंकल्या होता. मात्र यावेळी तृणमूलची आघाडी 158 पर्यंत घसरली आहे.  तर काँग्रेस आणि डाव्या पक्षांनाही दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. 

 पश्चिम बंगालमध्ये 2021 मध्ये निवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुकीपूर्वी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला भाजपाकडून कडवे आव्हान मिळू लागले आहे. 2014 ची लोकसभा आणि 2016 च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा आताचे चित्र बदलले आहे. बंगालमध्ये आक्रमकपणे मुसंडी मारणाऱ्या भाजपाने आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत 18 जागा मिळवताना सुमारे 40.3 टक्के मते मिळाली आहेत. तर तृणमूलच्या मतांची आकडेवारी घटून 43.3 टक्के राहिली आहे. एकूण मतदानाचा विचार केल्यास भाजपाला बंगालमध्ये  एकूण दोन कोटी 30 लाख 28 हजार 343 मते मिळाली आहेत. तर तृणमूल काँग्रेसला दोन कोटी 47 लाख 56 हजार 985 मते मिळाली आहेत.  मात्र बंगालमधील बदललेल्या हवेचा अंदाज ममता बॅनर्जी यांना आला आहे. त्यामुळे त्यांनी पक्षात राहून दगाबाजी करणाऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच आता आपण पक्षाच्या कामांमध्ये अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे संकेत ममता बॅनर्जी यांनी दिले आहेत. पाच वर्षांपूर्वीपर्यंत बंगालमध्ये फारसा प्रभाव नसलेल्या भाजपाने जोरदार आघाडी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी 128 जागांवर आघाडी घेणाऱ्या भाजपाला 60 मतदारसंघात 4 हजारांहून कमी मतांनी पिछाडीवर राहावे लागले आहे. त्यामुळे तृणमूलच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. त्यामुळे आता भाजपाची बंगालमधील घोडदौड रोखण्याचे आव्हान तृणमूल काँग्रेससमोर आहे.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाBJPभाजपाWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालwest bengalपश्चिम बंगाल