‘मी खासदार आहे, मला मारू नका… ’, बिहार पोलिसांचा भाजप खासदारावर लाठीचार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 17:30 IST2023-07-13T17:28:45+5:302023-07-13T17:30:42+5:30

बिहारमध्ये भारतीय जनता पक्ष नितीश सरकारविरोधात रस्त्यावर उतरला आहे.

Bihar Political News; 'I am an MP, don't beat me', Bihar police lathi charge on BJP MP | ‘मी खासदार आहे, मला मारू नका… ’, बिहार पोलिसांचा भाजप खासदारावर लाठीचार्ज

‘मी खासदार आहे, मला मारू नका… ’, बिहार पोलिसांचा भाजप खासदारावर लाठीचार्ज

Bihar Patna News: बिहारमध्ये भारतीय जनता पक्ष नितीश सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहे. एकीकडे विधानसभेत मोठा गोंधळ झाला, दुसरीकडे पोलिसांकडून आंदोलक भाजप कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. लाठीचार्जमध्ये एका भाजप नेत्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, एका भाजप खासदारालाही मारहाण झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, महाराजगंजचे भाजप खासदार जनार्दन सिंग सिग्रीवाल यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात जनार्दन सिंह सिग्रीवाल गंभीर जखमी झाले आहेत. 'मला सोडा, मारू नका, मी खासदार आहे', असे म्हटल्यावर पोलिसांनी त्यांना सोडले. मीडियासमोर आल्यानंतर त्यांनी सांगितले की, या घटनेत हात फ्रॅक्चर झाल्याचा संशय आहे, ते डॉक्टरांकडे जाणार आहेत. त्यांच्या अंगरक्षकांनाही मारहाण झाली आहे. सिग्रीवाल त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षारक्षक आणि समर्थकांमुळे पोलिसांपासून कसेबसे बचावले. 

सिग्रीवाल म्हणाले की, आम्ही शेतकरी आणि बिहारच्या तरुणांच्या बाजुने आवाज उठवत होतो. मात्र महाआघाडी सरकारने हा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे भाजप नेत्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही शांततेत विधानसभेवर मोर्चा काढत होतो. तरीही आमच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. शेकडो कार्यकर्ते जखमी झाले. पुढील निवडणुकीत जनता लाठीचार्जचा बदला घेईल.
 

Web Title: Bihar Political News; 'I am an MP, don't beat me', Bihar police lathi charge on BJP MP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.