Video - "माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं"; चेंगराचेंगरीत आई गमावलेल्या मुलाचा टाहो, प्रशासनावर संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 12:09 IST2026-04-01T12:06:34+5:302026-04-01T12:09:32+5:30

साहिल राज या तरुणाने रडत रडत आपल्या भावना व्यक्त केल्या.

bihar news son loses his mother in nalanda stampede maghra sheetla mata mela | Video - "माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं"; चेंगराचेंगरीत आई गमावलेल्या मुलाचा टाहो, प्रशासनावर संताप

Video - "माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं"; चेंगराचेंगरीत आई गमावलेल्या मुलाचा टाहो, प्रशासनावर संताप

बिहारच्या नालंदा येथे मंगळवारी सकाळी शीतला माता मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत आठ भाविकांचा मृत्यू झाला. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे पाटण्याला हलवण्यात आलं आहे. या दुर्घटनेनंतर आता मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे.

मृतांचे नातेवाईक यंत्रणेला दोष देत असून सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत. जत्रेमध्ये सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. साहिल राज या तरुणाने रडत रडत आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, "मला काहीच माहीत नाही, माझी आई गेली. पोस्टमार्टम रूममध्ये माझी आई पडली आहे. सरकारची कोणतीही व्यवस्था तिथे नव्हती. मघडा जत्रेत प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष होतं. या देशात सामान्य लोकांच्या जीवाची काहीच किंमत उरलेली नाही."

"शीतला मंदिरातील मृत्यूला सरकारच जबाबदार, लोकांच्या सुरक्षेची चिंता नाही"; काँग्रेसचा हल्लाबोल

साहिलने सांगितलं की, त्याची आई सकाळी चार वाजता जत्रेला जाण्यासाठी घरातून निघाली होती. तो स्वतः कामासाठी आणि शिक्षणासाठी पाटण्यात राहत असल्याने आईला शेवटच्या क्षणी पाहूही शकला नाही. "माझं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालं आहे. आता मी कोणाच्या आधारावर जगू?" असा सवाल त्याने उपस्थित केला.

"लोक एकमेकांवर पडले", शीतला मंदिरात चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार

Video - भयंकर! नालंदामधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी; ८ भाविकांचा मृत्यू; १२ जण जखमी

मूळचा इस्लामपूरचा असलेला साहिल पाटण्यात शिकतो आणि छोटं-मोठं काम करतो. चेंगराचेंगरीची बातमी समजताच त्याने घटनास्थळी धाव घेतली. तो संतापून म्हणाला, "माणूस तीर्थस्थळी कशासाठी जातो? शांतता आणि दर्शनासाठी... माझ्या आईचं वय काय होतं? एखादी वयस्कर व्यक्ती असती तर समजू शकलो असतं, पण आता आम्ही काय करू शकतो?" या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

Web Title : भगदड़ में माँ को खोने वाले बेटे का दुख, प्रशासन पर गुस्सा।

Web Summary : नालंदा, बिहार में मंदिर में भगदड़ से आठ की मौत। एक बेटे ने अपनी माँ की मौत पर शोक व्यक्त किया, मेले में सुरक्षा उपायों की कमी की आलोचना की। उसने प्रशासनिक लापरवाही पर सवाल उठाए।

Web Title : Son's grief: Mother lost in stampede, rages at administration.

Web Summary : In Nalanda, Bihar, eight died in a temple stampede. A son mourns his mother's death, criticizing the lack of safety measures at the fair. He questions the value of human life, highlighting administrative negligence.