पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 12:33 IST2025-06-23T12:33:15+5:302025-06-23T12:33:36+5:30

Bihar News: गेल्या काही दिवसांमध्ये नातेसंबंधांना कलंकित करणाऱ्या अनेक बातम्या समोर येत आहेत. दरम्यान, नात्याने पुतण्या लागणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडून एका महिलेने पती आणि तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीला सोडून त्याच्यासोबत लग्न केल्याची अजब घटना समोर आली आहे.

Bihar News: Aunt went crazy in love with nephew, left her husband and three-year-old daughter, married nephew | पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं

पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं

गेल्या काही दिवसांमध्ये नातेसंबंधांना कलंकित करणाऱ्या अनेक बातम्या समोर येत आहेत. दरम्यान, नात्याने पुतण्या लागणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडून एका महिलेने पती आणि तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीला सोडून त्याच्यासोबत लग्न केल्याची अजब घटना समोर आली आहे. बिहारमधील जमुई जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पती विशाल दुबे आणि मुलीला सोडून आयुषी कुमारी नावाच्या या महिलेने तिच्या पुतण्यासोबत एका मंदिरामध्ये लग्नगाठ बांधली.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार आयुषी कुमारी ही पाटणा येथील रहिवासी आहे. तसेच काही वर्षांपूर्वी तिचा विवाह हा सिकेरिया गावाीतल विशाल दुबे याच्यासोबत झाला होता. या दोघांनाही एक तीन वर्षांची मुलगीदेखील आहे.  मात्र मागच्या वर्षभरापासून तिचं पुतण्या सचिनसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. शेजारीच राहत असल्याने आयुषी आणि सचिन यांच्यातील जवळीक वाढली होती. तसेच मोबाईलवरील संभाषणातून त्याचं हे अनैतिक नातं अधिकच दृढ झालं होतं.

या प्रकरणाची कुणकुण घरी लागल्यावर आयुषीच्या पतीने या नात्याला कडाडून विरोध केला होता. त्यावरून घरात वादांना सुरुवात झाली होती. तसेच प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं. विशाल याने पत्नी आयुषीविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. तसेच घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला. मात्र तत्पूर्वीच आयुषी ही तिच्या प्रियकरासोबत फरार झाली.

घरातून पळाल्यानंतर आयुषी आणि तिचा प्रियकर असलेला सचिन हे पाच दिवसांनी गावात आले. तसेच त्यांनी गावातील मंदिरामध्ये लग्न केलं. लग्नानंतर आयुषीने सांगितलं की, माझा पती माझा सारखा छळ करायचा, त्यामुळे मी सचिनची नवा जोडीदार म्हणून निवड केली आहे. माझी मुलगी माझ्या आधीच्या पतीसोबतच राहील, तर मी सचिनसोबत राहीन. दरम्यान, सचिननेही आयुषीसोबतच्या प्रेमाचा स्वीकार करत लग्न करून आम्ही खूश असल्याचे सांगितले.

दुसरीकडे आयुषीचा आधीचा पती विशाल याने या लग्नाबाबत आणि आयुषीसोबतच्या नात्याबाबत आता आपल्याला कुठलंही देणं घेणं नसून, आता तिला जिथे राहायचं असेल, जसं राहायचं असेल, तसं ती राहू शकते, मी आता तिचा पुन्हा स्वीकार करणार नाही, असं सांगितलं.  

Web Title: Bihar News: Aunt went crazy in love with nephew, left her husband and three-year-old daughter, married nephew