हनीमूनच्या रात्रीच झालं असं काही की नवरी-नवरदेवाला हॉस्पिटलमध्ये करावं लागलं दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 12:40 IST2021-06-22T12:38:14+5:302021-06-22T12:40:01+5:30
कुटुंबीयांना पोलिसांना सांगितलं की, जमशेदपूरच्या सोनाटा पोलीस स्टेशन भागात राहणारी २८ वर्षीय शांती देवीने गोपालगंजमधील ३० वर्षीय मुकेश कुमार सिंहसोबत शनिवारी थावे मंदिरात लग्न केलं होतं.

हनीमूनच्या रात्रीच झालं असं काही की नवरी-नवरदेवाला हॉस्पिटलमध्ये करावं लागलं दाखल
बिहारच्या गोपालगंजमध्ये प्रेम विवाह करणाऱ्या एका कपलने हनीमूनच्या रात्रीच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सप्तपदीनंतर मधुचंद्राच्या रात्रीच या जोडप्याने विष खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर स्थितीत नवदाम्पत्याला एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. येथून त्यांना गोरखपूरला रेफर करण्यात आलं. या घटनेमुळे दोघांचेही कुटुंबीय धक्क्यात आहेत.
कुटुंबीयांना पोलिसांना सांगितलं की, जमशेदपूरच्या सोनाटा पोलीस स्टेशन भागात राहणारी २८ वर्षीय शांती देवीने गोपालगंजमधील ३० वर्षीय मुकेश कुमार सिंहसोबत शनिवारी थावे मंदिरात लग्न केलं होतं.
लग्नानंतर रविवारी घरी जेवणाचा कार्यक्रमही होता. जेवणाच्या कार्यक्रमानंतर पती-पत्नी दोघेही झोपण्यासाठी निघून गेले. मात्र, त्यांनी त्यावेळीच विष खाल्लं. सदर हॉस्पिटलमध्ये प्रेमी जोडप्याला घेऊन आलेल्या कुटुंबीयांनी सांगितलं की, दोघांनी चिकनमध्ये विष मिक्स करून खाल्लं होतं. (हे पण वाचा : बाबो! एकाच मंडपात दोन नवरींसोबत एका नवरदेवाने केलं लग्न, सारं गाव बघण्यासाठी जमलं)
दोघांनीही विष का खाल्लं याचं कारण कुणालाच माहीत नाही. असं सांगितलं जात आहे की, रूममध्ये दोघेही बेशुद्धावस्थेत आढळून आले. ज्यानंतर त्यांना कसंतर हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलं. रात्री दोघांवरही इमरजन्सी वार्डात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस येणार असल्याची माहिती मिळताच कुटुंबीय चांगल्या उपचारासाठी दोघांनाही घेऊन फरार झाले.
डॉक्टरांनुसार, कपलने विष खाल्ल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना उलटी यावी म्हणून सर्फचं पाणी पाजलं होतं. त्यानंतरही त्यांची स्थिती सुधारली नाही. त्यानंतर उपचारासाठी त्यांना कुटुंबीयांनी हॉस्पिटलमध्ये नेलं. याप्रकरणी पोलीस अधिकारी बीएन राय म्हणाले की, प्रकरणाची चौकशी केली जात आहे. दोघेही बेशुद्ध असल्याने चौकशी करता आली नाही.