शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

Bihar Loksabha Election Result 2019:  बिहारच्या जनतेने दिला मोदी-नितीश कुमारांना कौल; एनडीएला मिळाल्या 30 पेक्षा अधिक जागा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 4:22 PM

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात जेडीयूला सर्वाधिक फायदा होताना दिसत आहे. मागील वेळी 2 लोकसभा जागा जिंकणाऱ्या जेडीयूला यंदाच्या निकालात 15 हून अधिक जागा जिंकताना पाहायला मिळत आहे.   

पटणा - २०१९ च्या लोकसभा निकालात बिहारचा निकाल महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत. यातील जवळपास 36 पेक्षा अधिक जागा एनडीएच्या पारड्यात जाताना दिसत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जुने राजकीय मतभेद विसरत पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जवळ केलं होत. बिहारच्या जनतेने नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांना कौल दिला आहे.  

२०१३ मध्ये पंतप्रधानपदाच्या मुद्द्यावरून नितीश कुमार यांनी एनडीएपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर झालेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीत लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांनी एकत्र येत राज्यात सत्ता मिळवली होती. मात्र काही महिन्यात नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्याशी फारकत घेत पुन्हा भाजपाशी घरोबा केला.  २०१४ मध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयूला २ जागा मिळाल्या होत्या असं असतानाही बिहारमध्ये सध्याच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने जेडीयूला १७ जागा सोडल्या आहेत. बिहारमध्ये १५ टक्के मतांवर जेडीयूचा प्रभाव आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात जेडीयूला सर्वाधिक फायदा होताना दिसत आहे. मागील वेळी 2 लोकसभा जागा जिंकणाऱ्या जेडीयूला यंदाच्या निकालात 15 हून अधिक जागा जिंकताना पाहायला मिळत आहे.   

बिहारमधील ५० टक्के मतांवर भाजपा आणि जेडीयूचा प्रभाव आहे. तर ३० टक्के मतांवर काँग्रेस आणि लालू यादव यांच्या आरजेडीचा प्रभाव आहे. तर इतर २० टक्के मते निर्णायक असतात. बिहारमध्ये जातीय समीकरणे बघितली तर शहरी भाग, पुरुष आणि उच्च जातींवर भाजपाचा प्रभाव आहे तर जेडीयूवर ग्रामीण महिला, मागासवर्गीय जातींचा पगडा आहे. त्यामुळे बिहारची जनता कोणाला साथ देते याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. बिहारमध्ये भाजपाला 16, जेडीयू 15 तर एलजीपी 6 जागांवर आघाडी आहे. 

बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहे त्यात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला २२ जागा, काँग्रेसला २ जागा, एनसीपी १, जेडीयू २, लोक जनशक्ती पार्टी ६, राष्ट्रीय जनता दल(आरजेडी) ४ आणि इतरांना ३ जागा मिळाल्या होत्या. 

उत्तर प्रदेश, महाराष्ट्रनंतर बिहार राज्याचा निकाल केंद्रातील सत्ता स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जातीयवादाचा प्रभाव असणाऱ्या बिहारमध्ये एकूण ४० जागांपैकी ३४ जागा अनारक्षित तर ६ जागा आरक्षित आहे. देशाच्या राजकारणात बिहारची भूमिका महत्त्वाची असते. सध्या याठिकाणी आरजेडीचे लालूप्रसाद यादव, जेडीयूचे नितीश कुमार, रामविलास पासवान, शरद यादव, उपेंद्र कुशवाह, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, शकील अहमद, राजीव प्रताप रुडी या नेत्यांचा समावेश आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक निकाल 2019Nitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदी