निकालापूर्वीच 'घोडे बाजारा'ची भीती; काँग्रेस-राजद आपल्या आमदारांना 'या' ठिकाणी पाठवणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 12:57 IST2025-11-12T12:56:33+5:302025-11-12T12:57:56+5:30
Bihar Elections: बिहार निवडणुकीचे निकाल 14 नोव्हेंबरला लागणार आहेत.

निकालापूर्वीच 'घोडे बाजारा'ची भीती; काँग्रेस-राजद आपल्या आमदारांना 'या' ठिकाणी पाठवणार...
Bihar Elections: बिहार विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून, सर्व उमेदवारांचे भवितव्य आता EVM मध्ये बंद आहे. परवा, म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. मात्र, निकालांपूर्वी महाआघाडी (INDIA आघाडी) ची धाकधूक वाढली आहे. आमदार फुटण्याच्या भीतीने काँग्रेस आणि राजदने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
महआघाडीला ‘घोडे बाजारा’ची भीती
निकालानंतर ‘घोडे बाजारा’च्या (आमदारांची फोडाफोड) भातीने महाआघाडीने आपले विजयी आमदार इतर राज्यांत हलविण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय जनता दल निकाल जाहीर होताच आपल्या विजयी आमदारांना तातडीने पटना येथे बोलावून त्यांना सुरक्षित ठेवण्याचा विचार करत आहे. याशिवाय, लहान पक्षांमध्ये फोडाफोडीची शक्यता जास्त असल्याने, वीआयपीचे प्रमुख मुकेश सहनी यांनी विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. विजय मिळताच ते आपल्या आमदारांना पटना येथून थेट पश्चिम बंगाललामध्ये हलविण्याची योजना आखत आहेत.
काँग्रेस आमदारांना कुठे पाठवणार?
काँग्रेसने आपल्या जिल्हानिहाय आणि मतदारसंघनिहाय पर्यवेक्षांकडे निर्देश दिले आहेत की, विजय मिळाल्यावर आमदारांना त्यांच्या देखरेखीखाली पटना येथे आणावे आणि नंतर काँग्रेसशासित कर्नाटक किंवा तेलंगणात हलवावे. तसेच काँग्रेसने संकेत दिले आहेत की, ते IP गुप्ता यांच्या पक्षाच्या विजयी आमदारांनाही सामावून घेईल. याशिवाय, जर अपक्ष विजयी उमेदवार महाआघाडीशी जोडले, तर त्यांनाही या सुरक्षित ठिकाणी नेले जाईल.
बिहारमध्ये विक्रमी मतदान
बिहार निवडणुकीत यंदा रेकॉर्डब्रेक मतदानाची नोंद झाली आहे. पहिल्या टप्प्यात (6 नोव्हेंबर) 65.09% मतदान झाले, तर दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात (मंगळवार, 12 नोव्हेंबर) 67.14% मतदान झाले. हे राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक आहे.