'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 18:07 IST2025-08-30T18:05:02+5:302025-08-30T18:07:53+5:30

Bihar Election : आरा येथे मतदार हक्क यात्रेच्या समारोपाच्या वेळी, तेजस्वी यादव यांनी स्वतःला महाआघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केले.

Bihar Election: Tejashwi Yadav declares himself as CM candidate before Rahul Gandhi | 'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा

'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा

Bihar Election : काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या 'मतदार यात्रे'निमित्ताने बिहारचा दौरा करत आहेत. राजद नेते तेजस्वी यादवदेखील त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून साथ देत आहेत. दरम्यान, शनिवारी(दि.३०) ही यात्रा आरा येथे मतदार हक्क यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात तेजस्वी यादव यांनी राहुल गांधींसमोर स्वतःला महाआघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित केले. 

खरा विरुद्ध डुप्लिकेट मुख्यमंत्री 
आपल्या भाषणादरम्यान तेजस्वी यादव यांनी जनतेला विचारले, तुम्हाला खरा मुख्यमंत्री हवा आहे की डुप्लिकेट? जनतेला आता बदल हवा आहे. बिहारमधील प्रत्येकजण म्हणत आहे की, आम्हाला खरा मुख्यमंत्री हवा आहे, डुप्लिकेट मुख्यमंत्री नाही. बिहारसाठी मीच योग्य पर्याय आहे, असे तेजस्वी यांनी यावेळी म्हटले.

राहुल गांधी तेजस्वींना पाठिंबा देतील?
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी राहुल गांधींना तेजस्वी यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता, तेव्हा त्यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नव्हते. पण आज आरा येथील रॅलीत तेजस्वी यांनी त्यांच्यासमोर जाहीर केले की, ते महाआघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहेत.

Web Title: Bihar Election: Tejashwi Yadav declares himself as CM candidate before Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.