बिहारमध्ये २०१० च्या इतिहासाची पुनरावृत्ती; नितीश कुमार अन् भाजपाने पुन्हा केली जबरदस्त कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 16:09 IST2025-11-14T16:09:30+5:302025-11-14T16:09:56+5:30

बिहारमध्ये २०१० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीकडे लक्ष वेधले असता तेव्हाही नितीश कुमारांची जेडीयू एनडीएचा भाग होती

Bihar Election Result: History of 2010 repeated in Bihar; Nitish Kumar and BJP NDA once again achieved a huge majority in bihar | बिहारमध्ये २०१० च्या इतिहासाची पुनरावृत्ती; नितीश कुमार अन् भाजपाने पुन्हा केली जबरदस्त कमाल

बिहारमध्ये २०१० च्या इतिहासाची पुनरावृत्ती; नितीश कुमार अन् भाजपाने पुन्हा केली जबरदस्त कमाल

पटना - बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. सुरुवातीचे कौल आणि समोर आलेले निकाल यावरून एनडीएची बंपर कामगिरी दिसून येत आहे. राज्यातील २४३ जागांपैकी १९५ ते २०५ जागांवर एनडीए आघाडीवर आहे तर विरोधकांचा सुपडा साफ झाला आहे. महाआघाडीला अर्धशतकही पूर्ण करता आले नाही. २०२५ च्या एनडीएच्या विजयानंतर २०१० च्या निवडणूक निकालाच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. ही तीच निवडणूक होती, ज्यात भाजपा आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूने फक्त कमालच केली नाही तर विरोधकांना जबरदस्त झटका दिला होता.

२०१० च्या काळात बिहारच्या राजकारणात लालू प्रसाद यादव सक्रीय होते. तेजस्वी यादव राजकारणाचे धडे गिरवत होते. सध्या लालू यादव यांचे वाढते वय, इतर आरोप आणि शिक्षेमुळे ते राजकारणात फारसे सक्रीय नाहीत. ते पक्षाचे मुख्य असले तरीही तिकीट वाटपापासून इतर राजकीय समीकरणे आखण्याची जबाबदारी तेजस्वी यादव यांनी हाती घेतली आहे. एक दोन प्रचारसभा वगळता लालू प्रसाद यादव प्रचारापासूनही दूर आहेत. निवडणुकीची कमान तेजस्वी यादव यांच्याकडे आहे परंतु जे निकाल सध्याच्या निवडणुकीत समोर आलेत ते पाहून २०१० ची आठवण ताजी झाली.

२०१० मध्ये कसं होतं जागावाटप?

बिहारमध्ये २०१० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीकडे लक्ष वेधले असता तेव्हाही नितीश कुमारांची जेडीयू एनडीएचा भाग होती. तेव्हा जागावाटपात जेडीयू १४१ तर भाजपा १०२ जागांवर निवडणूक लढली होती. या निवडणुकीत बिहार भाजपाचा चेहरा सुशील कुमार मोदी होते, ज्यांचे निधन झाले आहे. लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीने १६८ तर रामविलास पासवान यांच्या एलजेपीने ७५ जागांवर निवडणूक लढली होती. काँग्रेसने स्वबळावर २४३ जागा लढवल्या होत्या. या निवडणुकीत महाआघाडी नव्हती परंतु आरजेडी आणि एलजेपी यांची आघाडी होती. 

एनडीएने २०६ जागा जिंकल्या...

जेव्हा निवडणुकीचे निकाल आले तेव्हा एनडीएने रेकॉर्डब्रेक २०६ जागांवर विजय मिळवला. या निकालात विरोधी आरजेडी, एलजेपी आणि काँग्रेसला केवळ २५ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत जेडीयू ११५, भाजपा ९१ जागांवर विजयी झाली होती. दुसरीकडे आरजेडी २२ आणि एलजेपी ३ आणि काँग्रेसने ४ जागा जिंकल्या होत्या. इतरांना या निकालात ८ जागा मिळाल्या होत्या. २०१० च्या निकालात एनडीएचा ऐतिहासिक विजय झाला होता, तेव्हाही विरोधी आघाडीला ५० जागाही जिंकता आल्या नाहीत. 

दरम्यान, २००५ च्या तुलनेत २०१० साली जेडीयूला २७ जागांचा फायदा झाला होता तर भाजपाही ३६ अधिकच्या जागा जिंकून आली होती. विरोधकांना ३२ जागांवर नुकसान झाले. जेडीयूच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाली होती. 

Web Title : बिहार में 2010 दोहराया गया: नीतीश कुमार और भाजपा की फिर कमाल!

Web Summary : बिहार में नीतीश कुमार और भाजपा के नेतृत्व वाले एनडीए ने 2010 की सफलता दोहराई, भारी बढ़त हासिल की। विपक्ष संघर्ष कर रहा है, पचास सीटें भी हासिल करने में विफल रहा है। लालू यादव की अनुपस्थिति महागठबंधन के प्रदर्शन को प्रभावित करती है, जो एनडीए के पहले प्रभुत्व की याद दिलाती है।

Web Title : Bihar repeats 2010: Nitish Kumar and BJP's stunning victory again!

Web Summary : Bihar's NDA, led by Nitish Kumar and BJP, mirrors its 2010 triumph, securing a massive lead. The opposition struggles, failing to reach even fifty seats. Lalu Yadav's absence impacts the Mahagathbandhan's performance, reminiscent of NDA's prior dominance.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.