शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: बच्चू कडूंचा पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार?, थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार
3
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
4
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
5
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
7
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
8
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
9
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
10
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
11
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
12
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
13
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
14
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
15
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
16
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
17
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
18
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
19
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
20
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 14:33 IST

नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाकडून एक फोटो पोस्ट करण्यात आला होता, त्यात न भूतो न भविष्यती..नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील असं कॅप्शन दिले होते.

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा कौल आता स्पष्ट झाला आहे. सध्या मतमोजणी सुरू आहे परंतु नितीश कुमार यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये एनडीएने जबरदस्त आघाडी घेतली आहे. त्यात भारतीय जनता पार्टीला ९१ आणि जेडीयूला ७८ जागांची आघाडी आहे. त्यातच JDU ने त्यांच्या सोशल मिडिया हँडलवरून नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्री बनण्याची पोस्ट केली, त्यानंतर काही वेळाने ही पोस्ट डिलीट करण्यात आली. त्यामुळे बिहारमध्ये मुख्यमंत्रि‍पदावरून एनडीएत वाद निर्माण होणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाकडून एक फोटो पोस्ट करण्यात आला होता, त्यात न भूतो न भविष्यती..नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील असं कॅप्शन दिले होते. त्याआधी एका समर्थकाने पटना येथील पक्षाच्या मुख्यालयासमोर एक पोस्टर लावत टायगर अभी जिंदा है असं नितीश कुमारांचा उल्लेख केला होता. विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी नितीश कुमार यांची तब्येत ठीक नाही, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे असं वातावरण निर्मिती केली जात होती. परंतु मतदान संपल्यानंतर ज्यारितीने ते सक्रीय झाले आहेत, ते पाहता एनडीएमध्ये वेगळा संदेश गेला आणि आता नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनण्याच्या मार्गावर आहेत.

बिहारच्या राजकारणात मागील दोन दशकांपासून 'सुशासन बाबू' अशी ओळख असलेले नितीश कुमार हे कोणत्याही आघाडीचे अविभाज्य घटक राहिले आहेत. त्यांच्या वारंवार बदलणाऱ्या राजकीय भूमिका आणि वाढत्या वयामुळे त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भाजपने या कमकुवतपणाचा फायदा घेऊन बिहारमध्ये आपले स्वतंत्र वर्चस्व स्थापित करण्याची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.बिहारमध्ये एनडीए डबल सेंच्युरीकडे पोहोचली असून १९८ जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यात भाजपाची संख्या जेडीयूपेक्षा जास्त आहे. 

दरम्यान, भाजपने निवडणुकीपूर्वी नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून स्पष्टपणे जाहीर न करण्याची खबरदारी घेतली आहे. 'डबल-इंजिन सरकार' या घोषणेवर अधिक भर देऊन भाजपाने भविष्यातील नेतृत्वाचा पर्याय खुला ठेवला आहे. आता निकालांनंतर भाजपा नितीश कुमारांशिवाय सरकार बनवण्याचा किंवा त्यांच्या भूमिकेत मोठा बदल करण्याचा विचार करू शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nitish Kumar to Remain CM? JDU's Deleted Post Sparks Speculation

Web Summary : Despite NDA's lead in Bihar, JDU's deleted post about Nitish Kumar remaining Chief Minister fuels speculation. BJP's growing influence and reluctance to explicitly name Kumar as CM candidate raise questions about his future role.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी