बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 18:33 IST2025-11-14T18:32:41+5:302025-11-14T18:33:29+5:30
bihar election result 2025 - मोदी म्हणाले, एनडीएने राज्यात सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. आमचा ट्रॅक रेकॉर्ड आणि काम बघून जनतेने आम्हाला प्रचंड बहुमत दिले आहे.

बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये एनडीएला ऐतिहासिक विजय मिळताना दिसत आहे. 243 पैकी 200 हून अधिक जागांवर एनडीए आघाडीवर आहे. या विजयाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या जनतेचे आणि एनडीएतील सहकारी पक्षांचे तसेच कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान मोदी म्हणाले, “बिहारमध्ये सुशासन, विकास, जनकल्याण आणि सामाजिक न्यायाचा विजय झाला आहे. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजय मिळवून दिल्याबद्दल मी बिहारमधील माझ्या कुटुंबीयांचे मनापासून आभार मानतो. हा प्रचंड जनादेश आपल्याला लोकांची सेवा करण्यास आणि बिहारसाठी नवीन संकल्पाने काम करण्यास शक्ती देईल.
मोदी म्हणाले, एनडीएने राज्यात सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. आमचा ट्रॅक रेकॉर्ड आणि काम बघून जनतेने आम्हाला प्रचंड बहुमत दिले आहे. या शानदार विजयाबद्दल मी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आमचे एनडीएचे सहकारी चिराग पासवान, जितन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाह यांचे मनापासून अभिनंदन करतो.
सुशासन की जीत हुई है।
— Narendra Modi (@narendramodi) November 14, 2025
विकास की जीत हुई है।
जन-कल्याण की भावना की जीत हुई है।
सामाजिक न्याय की जीत हुई है।
बिहार के मेरे परिवारजनों का बहुत-बहुत आभार, जिन्होंने 2025 के विधानसभा चुनावों में एनडीए को ऐतिहासिक और अभूतपूर्व जीत का आशीर्वाद दिया है। यह प्रचंड जनादेश हमें…
मोदी पुढे म्हणाले, अथक परिश्रम करणाऱ्या प्रत्येक एनडीए कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. त्यांनी जनतेपर्यंत पोहोचून आमचा विकासाचा अजेंडा मांडला आणि विरोधकांच्या प्रत्येक खोट्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. मी त्यांचे मनापासून कौतुक करतो!
तसेच, पुढील काळात बिहारच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक वेगाने पावले उचलली जातील. राज्यातील पायाभूत सुविधा, उद्योग, संस्कृती तसेच युवावर्ग व महिलांच्या प्रगतीसाठी ठोस धोरणे राबवली जातील. बिहारला समृद्ध आणि सक्षम बनवण्याच्या दिशेने केंद्र-राज्य समन्वयाने कार्य करेल, असा विश्वासही मोदींना यावेळी व्यक्त केला.