शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 16:14 IST

Bihar Election Result 2025: बिहारमधील ऐतिहासिक विजयानंतर NDA मध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.

Bihar Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर एनडीएने सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग दिला आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांची नावे निश्चित करण्यासाठी भाजप आणि जदयूची एक बैठक पार पडली. या बैठकीत सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. प्रत्येक सहा आमदारांसाठी एक मंत्रिपद, असा फॉर्म्युला लागू केला जाण्याची शक्यता आहे.

17 नोव्हेंबरला जेडीयूची बैठक 

जेडीयूचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय कुमार झा सध्या दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी चर्चा करत असून, आज किंवा उद्या पाटणा येथे परततील. यानंतर ते मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतील आणि पुढील रणनती ठरवतील. त्यानंतर उद्या, म्हणजेच 17 नोव्हेंबर रोजी जेडीयू विधीमंडळ दलाची बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे. तसेच, एनडीएचा नेता निवडण्याची प्रक्रिया 18 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

घटक पक्षांची दिल्लीवाी

सरकार स्थापनेच्या चर्चेला वेग आला असताना एनडीएच्या घटक पक्षांचे नेते दिल्लीमध्ये महत्त्वाच्या भेटी देत आहेत. हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे संरक्षक आणि केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी आज दिल्लीला पोहोचणार असून, ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपच्या अन्य वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करतील.

याशिवाय, राष्‍ट्रीय लोकदलाचे प्रमुख उपेंद्र कुशवाहा आज दिल्लीला रवाना झाले आहेत. तेही अमित शाहांना भेटून सरकार स्थापनेबाबत चर्चा करणार आहेत. एलजेपी (रामविलास)चे प्रमुख चिराग पासवानदेखील आज दिल्लीकडे रवाना झाले असून, LJP(R), HAM आणि RLM या पक्षांसोबत संयुक्त बैठकीत मंत्रिमंडळातील सहभागावर चर्चा करणार आहेत.

बिहार निवडणुकीत कोणाला किती जागा?

 

पक्षजिंकलेल्या जागा
भाजप89
जेडीयू85
एलजेपी (रामविलास)19
HAM5
RLM4
महाआघाडी (काँग्रेस+राजद+)35
English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Government Formation Accelerates; Cabinet Allocation Formula Finalized?

Web Summary : NDA speeds up Bihar government formation after election victory. BJP and JDU discuss cabinet positions, possibly allocating one ministry per six MLAs. Key leaders are meeting in Delhi to finalize details and strategy.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५BJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारchirag paswanचिराग पासवानNarendra Modiनरेंद्र मोदी