Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 21:18 IST2025-10-18T21:17:13+5:302025-10-18T21:18:09+5:30
तेज प्रताप यादव यांच्या जनशक्ती जनता दलाचा उमेदवार म्हशीवर बसून आला. या अरवल विधानसभा मतदारसंघात हे घडलं.

Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
Bihar Assembly Election: निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना प्रत्येक उमेदवार शक्ती प्रदर्शन करतोच. प्रचंड गर्दी गाडीत उभे राहून रॅली... अशी दृश्ये निवडणुकीच्या काळात बघायला मिळतात. पण, बिहारमध्ये एक उमेदवार अर्ज भरण्यासाठी चक्क म्हशीवर बसून आला. अरूण यादव असे या उमेदवाराचे नाव असून, ते तेज प्रताप यादव यांच्या जनशक्ती जनता दलाकडून निवडणूक लढवत आहेत.
अरवल विधानसभा मतदारसंघातून अरुण यादव यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी ते म्हशीवर बसून आले. म्हशीवरून बसून आल्याने त्यांना बघण्यासाठीही लोकांनी गर्दी केली होती. त्यांचे व्हिडीओही व्हायरल होत आहे.
तेज प्रताप यादव के प्रत्याशी अरुण यादव भैंस पर चढ़कर नामांकन करने पहुंचे#BiharElection2025pic.twitter.com/X86XD0BRjo
— NDTV India (@ndtvindia) October 18, 2025
म्हशीवर बसून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या अरुण यादव यांनी म्हणाले की, लालू प्रसाद यादव आमच्यासाठी पूज्यनिय आहेत. आम्ही त्यांच्याच आदर्शांवर चालणारे लोक आहोत. तेज प्रताप यादव हे लालू प्रसाद यांचे सुपूत्र आहेत आणि त्याच्या पक्षाकडून मी निवडणूक लढवत आहे. लालू प्रसाद यादव यांच्याच स्टाईलमध्ये मी निवडणूक अर्ज भरण्यासाठी आलो आहे.