Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 16:56 IST2025-11-12T16:55:32+5:302025-11-12T16:56:05+5:30
Maithili Thakur Exit Poll: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून, एक्झिट पोल पुन्हा एनडीएचे सरकार येणार असा कौल देत आहे. गायिका मैथिली ठाकूरही निवडणूक लढवत असून, तिच्या निकालाकडेही सगळ्यांचं लक्ष आहे.

Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
Bihar Election Maithili Thakur Resutl: बिहार विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले. दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. सगळ्याच एक्झिट पोलमध्ये जदयू आणि भाजपचे एनडीए सरकार पुन्हा येणार असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. बिहारमध्ये अनेक मतदारसंघांच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष असून, यापैकी एक आहे अलीनगर विधानसभा. याच मतदारसंघातून मैथिली ठाकूर निवडणूक लढवत आहे. या मतदारसंघाबद्दलही एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या राजकारणाला कलाटणी देणारी ही निवडणूक ठरणार असून, १४ नोव्हेंबर रोजी बिहारच्या सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, हे स्पष्ट होईल. पण त्यापू्र्वीच आलेल्या एक्झिट पोल्सनी पुन्हा एनडीएचे सरकार येणार असल्याचे अंदाज मांडले आहेत. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे बहुतांश सगळ्याच एक्झिट पोलचे अंदाज आहेत.
मैथिली ठाकूरच्या मतदारसंघात काय होणार?
गायिका मैथिली ठाकूर अचानक राजकारणात पाऊल ठेवले. मैथिली ठाकूर अलीनगर विधानसभा मतदारसंघातून लढत आहे. या मतदारसंघातील निकाल काय असू शकतो, याबद्दल जेव्हीसी एक्झिट पोलने अंदाज मांडला.
जेव्हीसी एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, अलीनगर विधानसभा मतदारसंघातून मैथिली ठाकूर विजयी होईल. मैथिली ठाकूरविरोधात महाआघाडीचे विनोद मिश्र हे उमेदवार आहेत. तर प्रशांत किशोर जनसुराज्य पक्षाने विप्लव झा यांना उमेदवारी दिलेली आहे.
मिथिलांचल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रदेशात विधानसभेच्या ४२ जागा आहेत. यापैकी ३१ ते ३२ जागा एनडीए जिंकले, तर १० ते ११ जागा महाआघाडी जिंकण्याचा अंदाज जेव्हीसी एक्झिट पोलने व्यक्त केला आहे.
१४ वेगवेगळ्या संस्थांनी मांडलेल्या एक्झिट पोलच्या पोल ऑफ पोल्सनुसार एनडीएला १५४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाआघाडीला ८४ जागा मिळतील. इतर पक्षाच्या खात्यात ५ जागा जाण्याचा अंदाज मांडण्यात आला आहे.