Bihar Election 2025 India Alliance Update: बिहार विधानसभा मिवडणुकीत हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चानेइंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे महासचिव सुप्रियो भट्टाचार्य यांनी घोषणा केली की झारखंड मुक्ती मोर्चा बिहार विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढेल. ज्या मतदारसंघातून झारखंड मुक्ती मोर्चा निवडणूक लढणार आहे, त्यांची घोषणाही भट्टाचार्य यांनी केली.
सुप्रियो भट्टाचार्य यांनी सांगितले की, आम्ही इंडिया आघाडीसोबत लढणार नाही. आम्ही स्वबळावर निवडणुकीत उतरणार आहोत." बिहारमधील चकाई, धमदाहा, कटोरिया, पिरपैंती, मनिहारी आणि जमुई या विधानसभा मतदारसंघातून झारखंड मुक्ती मोर्चा उमेदवार उतरवणार आहे.
राजद, काँग्रेसमध्ये एकवाक्यात नाहीच
एकीकडे निवडणुकीची तारीख जवळ येत असताना राजद, काँग्रेस आणि मित्रपक्षांमध्ये एकवाक्यता झालेली नाही. ७ जागांवर इंडिया आघाडीतील मित्रपक्षांनीच एकमेकाविरोधात उमेदवार उतरवले आहेत.
लालगंज, वैशाली, राजापाकर, बछवाडा, रोसरा आणि बिहारशरीफ या विधानसभा मतदारसंघात इंडिया आघाडीतून एकापेक्षा जास्त उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीत एकी किती आहे? याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.
सिंकदरा विधानसभा मतदारसंघातही राजकीय संघर्ष सुरू आहे. ही जागा काँग्रेसला दिली गेली आहे. विनोद चौधरी येथून लढणार आहेत. पण, राष्ट्रीय जनता दलाच्या चिन्हावर माजी विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांनीही अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आमने-सामने असल्याचे चित्र आहे.
Web Summary : Jharkhand Mukti Morcha (JMM) exits India Alliance for Bihar's 2025 elections, opting to contest independently from six constituencies. Rifts emerge within the Alliance as multiple candidates file nominations against each other in key seats. Internal conflict raises concerns about unity within the coalition.
Web Summary : झारखंड मुक्ति मोर्चा (जेएमएम) ने बिहार के 2025 चुनावों के लिए इंडिया गठबंधन से बाहर निकलने का फैसला किया है, छह निर्वाचन क्षेत्रों से स्वतंत्र रूप से चुनाव लड़ेगा। गठबंधन के भीतर दरारें उभरती हैं क्योंकि कई उम्मीदवार प्रमुख सीटों पर एक-दूसरे के खिलाफ नामांकन दाखिल करते हैं। आंतरिक संघर्ष से गठबंधन के भीतर एकता को लेकर चिंताएं बढ़ रही हैं।