शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Assembly Election Results : "महाआघाडीला पचणार नाही एक्झिट पोलच्या विजयाचा लाडू, एनडीएचे सरकार बनणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 09:21 IST

Bihar Assembly Election Results : बहुतांश एक्झिट पोलमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील महाआघाडीकडे कौल दिसत आहे. मात्र, निकाल राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बाजूने लागेल असा भाजपाला विश्वास आहे. 

ठळक मुद्देसर्वच एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांच्या महाआघाडीला कौल देण्यात आला आहे. त्यामुळे मतमोजणीत कोण बाजी मारणार, हे पाहण्याचे ठरणार आहे.

नवी दिल्ली / पटना :  बिहार विधानसभा निवडणुकीच्या अंतिम फेरीच्या मतदानानंतर जाहीर झालेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील महाआघाडीकडे कौल दिसत आहे. मात्र, निकाल राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बाजूने लागेल असा भाजपाला विश्वास आहे. 

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी सोमवारी मतमोजणीच्या एक दिवस आधी दावा केला की, बिहारमध्ये एनडीए सरकार प्रचंड बहुमताने बनणार आहे आणि नितीशकुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारतील. त्यांनी एक निवेदन जारी केले की, "बिहारमधील तीन टप्प्यांच्या निवडणुका संपल्यानंतर एक गोष्ट निश्चित आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि मोठ्या संख्येने मतदारांनी एनडीएच्या बाजूने मतदान केले आहे."

बिहार एक्झिट पोलमधील अंदाज फेटाळत शाहनवाज हुसैन यांनी निकाल एनडीएच्या बाजूने असेल, असा दावा केला आहे. ते म्हणाले, " १० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत बिहारमध्ये जबरदस्त बहुमताने एनडीए सरकार स्थापन होणार आहे आणि नितीशकुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार पाहतील." याचबरोबर, २०१५ च्या बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलचा संदर्भ देत त्यावेळी जनता दल संयुक्त एनडीएचा भाग नसताना बहुतेक अंदाजांमध्ये भाजपा सरकार स्थापन केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावेळी एक्झिट पोल चुकीचे ठरले होते. याशिवाय इतर बर्‍याच प्रसंगी एक्झिट पोलमध्ये केलेले अंदाज चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आहेत, असे हुसैन म्हणाले. 

एक्झिट पोलच्या आधारे महाआघाडीद्वारे लाडू बनवण्याच्या दाव्यावर हुसैन म्हणाले की, अजून काहीवेळ महाआघाडीचे लोक लाडू खातील. निकालानंतर ते लाडू पचवणार नाहीत. बिहारची जनता कधीही महाआघाडीला पचवणार नाही. आरजेडीचा कारभार सर्वांनी पाहिला आहे. तसेच, हुसैन यांनी दावा केला की, 'या आकलनाच्या आधारे आम्ही असे म्हणू शकतो की, महाआघाडीसाठी एक्झिट पोलचा निकाल दोन दिवसांचा आनंद आहे. वास्तविक निकाल दहा तारखेला येतील तेव्हा एनडीए सरकार बिहारमध्ये प्रचंड बहुमताने परत येईल आणि नितीशकुमार बिहारच्या हितासाठी पुढील पाच वर्ष सुशासन आणि विकासाचे राज्य स्थापन करतील.

नितीशकुमार की तेजस्वी, कोण बाजी मारणार?बिहार विधानसभा निवडणूक निकालाची मतमोजणी सुरू झाली आहे. तमाम मतदानोत्तर जनमत चाचण्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे युवा नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला दिलेले झुकते माप आणि तरुणांमध्ये तेजस्वी यांच्याविषयी असलेले आकर्षण या पार्श्वभूमीवर बिहारच्या मुख्यमंत्रिपदी तेजस्वी यांना पसंती दिली जाते की, मतदार नितीशकुमार यांना चौथ्यांदा संधी देतात, याचा फैसला आज होणार आहे. बिहारमधील या निकालांबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतमोजणीची प्रक्रिया सकाळी 8 वाजता सुरू झाली आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांच्या महाआघाडीला कौल देण्यात आला आहे. त्यामुळे मतमोजणीत कोण बाजी मारणार, हे पाहण्याचे ठरणार आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपाTejashwi Yadavतेजस्वी यादवNitish Kumarनितीश कुमारBiharबिहार