Bihar Chimney Blast: भयावह! वीटभट्टीला आग लावताना चिमणीचा स्फोट, ६ जणांचा मृत्यू, १२ जखमी, २० लोक बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 22:10 IST2022-12-23T22:05:45+5:302022-12-23T22:10:02+5:30
Bihar Chimney Blast: बिहारमधील रक्सौल येथे ही घटना घडली आहे.

Bihar Chimney Blast: भयावह! वीटभट्टीला आग लावताना चिमणीचा स्फोट, ६ जणांचा मृत्यू, १२ जखमी, २० लोक बेपत्ता
नवी दिल्ली: बिहारमधील रक्सौल येथे झालेल्या चिमणीचा स्फोट झाल्याने ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत १२ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. यासोबतच सुमारे २० लोक बेपत्ता आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. अडकलेल्या मजुरांना शोधण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
आज (शुक्रवारी) संध्याकाळी रक्सौल उपविभागातील रामगढवा पोलीस ठाण्यातील नारीगीर येथे वीटभट्टीला आग लावताना चिमणीचा स्फोट झाला. यामुळे ६ मजुरांचा मृत्यू झाला असून १२ मजूर जखमी झाल्याची माहिती आहे. यामध्ये चिमणी मालकाचाही समावेश आहे. स्फोटानंतर अनेक मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती देखील समोर येत आहे.
अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका घटनास्थळी
अग्निशमन दलाच्या दहा गाड्या, पोलिस दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यासोबतच ढिगाऱ्याखाली दबलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले.
अपघाताच्या वेळी ५० जण घटनास्थळी-
जखमींवर एसआरपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोटाच्या वेळी चिमणीजवळ सुमारे ५० लोक होते, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"