शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

Bihar Assembly Election Results : बिहारनंतर यूपी, बंगालमध्येही ओवैसी खेळ बिघडवणार? 'या' पक्षांना धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 8:17 AM

asaduddin owaisi : असदुद्दीन ओवैसी यांच्या 'एआयएमआयएम'ने बिहारमध्ये पाच जागा जिंकून कमाल केली आहे.

ठळक मुद्देबिहार निवडणुकीत ओवैसी यांच्या पक्षाच्या कमालीचा अंदाज निवडणूक विश्लेषकांना बांधता आला नाही.

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीचा निकाल पाहता सर्वच एक्झिट पोलचे अंदाज फोल ठरले आहेत. एनडीएने बाजी मारली तर आरजेडीने सुद्धा चांगली टक्कर दिल्याचे पाहायला मिळाले. यातच, असदुद्दीन ओवैसी यांच्या 'एआयएमआयएम'ने बिहारमध्ये पाच जागा जिंकून कमाल केली आहे.

बिहार निवडणुकीत ओवैसी यांच्या पक्षाच्या कमालीचा अंदाज निवडणूक विश्लेषकांना बांधता आला नाही. दरम्यान, सीमांचलमध्ये मुस्लिमांची संख्या जास्त आहे. अशा परिस्थितीत लोक एनडीएला पराभूत करण्यासाठी मतदान करतील आणि त्याचा फायदा महाआघाडीला होईल, असे गणित असे मांडण्यात येत होते. मात्र ओवैसी यांच्या पक्षाला इतक्या जागा मिळतील, अशी अपेक्षा कोणालाही नव्हती.

बिहारनंतर उत्तर प्रदेश आणि बंगालमध्ये निवडणुका लढवण्याची घोषणा महाआघाडीचे नेते तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांनी सतत ओवैसी यांच्यावर मतं फोडण्याचा आरोप केला. इतकेच नाही तर ओवैसी यांचा पक्ष भाजपाची बी टीम असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, आता बिहारमधील विजयामुळे खूश झालेल्या ओवैसी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, "बंगाल आणि यूपीच्या निवडणुकाही लढवणार आहोत, तुम्ही काय कराल? निवडणुका लढविणे हे आपले काम आहे आणि लोकशाहीने आम्हाला हा अधिकार दिला आहे."

पश्चिम बंगालमध्ये सुमारे ३० टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने राज्यातील ४२ पैकी १८ जागा जिंकल्या. सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यातील मतदानाच्या टक्केवारीत थोडा फरक होता. जिथे भाजपाला ४०.२५ टक्के मतं मिळाली होती, तिथे ४३.२९ टक्के मते मिळाली. मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकारणात माहिर असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यासाठी आता ओवैसी यांची पार्टी हे एक आव्हान ठरू शकते. बिहारमध्ये ज्या प्रकारे मुस्लिमांनी  ओवैसींच्या पक्षाला मतदान केले. त्यावरून हे स्पष्ट आहे की, आता देशातील मुस्लिमांनी ओवैसींच्या पक्षाकडे पर्याय म्हणून पाहण्यास सुरवात केली आहे. अशा परिस्थितीत ओवैसी यांच्या पक्षाने बंगालमध्ये निवडणुका लढविल्यास त्याचा थेट फायदा भाजपाला होईल आणि तृणमूल काँग्रेसला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशात एआयएमआयएमने बसपासोबत युती केली तर सपा-काँग्रेसचे गणित बिघडणार! बिहारमध्ये ओवैसी यांच्या एआयएमआयएमने बसपासोबत निवडणूक लढविली. या निवडणुकीत बसपाला एक जागा आणि एआयएमआयएमला पाच जागा मिळाल्या. उत्तर प्रदेशात दलितांचे राजकारण करणाऱ्या बसपासोबत जर एआयएमआयएम निवडणुकीच्या रिंगणात उतरला तर त्याचा थेट परिणाम काँग्रेस व समाजवादी पक्षाला होईल. उत्तर प्रदेशात मुस्लिम-यादवांची पारंपारिक मतं समाजवादी पार्टीच्या पारड्यात जाताना दिसून येतात. मात्र, जर उत्तर प्रदेशच्या मुस्लिमांनी ओवैसींच्या पक्षाला स्वीकारले तर बिहारप्रमाणेच समाजवादी पार्टीसाठी धोक्याची घंटा ठरेल. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकUttar Pradeshउत्तर प्रदेशwest bengalपश्चिम बंगाल