Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 09:51 IST2025-11-14T09:49:51+5:302025-11-14T09:51:50+5:30
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणूक २०२५ च्या निकालासाठी आज मतमोजणी सुरू आहे.

Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू असून, राज्यात कोणत्या पक्षाला किंवा आघाडीला सत्ता मिळणार, हे आज स्पष्ट होईल. बिहारमध्ये एकूण २४३ विधानसभा जागा असून, सरकार स्थापन करण्यासाठी नेमक्या किती जागांची आवश्यकता आहे, हे जाणून घेऊयात.
बिहार विधानसभेत एकूण २४३ जागा आहेत. कोणत्याही विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी बहुमत सिद्ध करणे आवश्यक असते. बहुमतासाठी एकूण जागांच्या निम्म्यापेक्षा एक जास्त जागा जिंकणे आवश्यक आहे. म्हणजेच बिहारमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला १२१ किंवा त्यापेक्षा अधिक जागा जिंकणे आवश्यक आहे.
एनडीए आणि महाआघाडीत यांच्यात टक्कर
एखादा पक्ष स्वतंत्रपणे किंवा युतीद्वारे विधानसभेत बहुमत मिळवू शकतो. बिहारमध्ये सध्या दोन प्रमुख आघाड्या आहेत, ज्यात एनडीए (भाजप, जेडीयू) आणि महाआघाडी (आरजेडी, काँग्रेस) यांचा समावेश आहे. एनडीए किंवा महाआघाडी यापैकी कोणत्याही आघाडीने १२२ जागा जिंकल्या तर, त्या आघाडीला बहुमत मिळेल आणि ती बिहारमध्ये पुढील सरकार स्थापन करू शकेल.
मतमोजणी सुरू
बिहारमध्ये विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात पार पडली. सध्या ४६ मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीला मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली आणि आता ईव्हीएम मतांची मोजणी सुरू आहे. जसजशी मतमोजणी पुढे सरकेल, तसतसे एनडीए किंवा महाआघाडी यापैकी कोणाला १२२ चा जादुई आकडा गाठता येतो, हे निश्चित होईल.