...तर मी संन्यास घेईन; प्रशांत किशोरांनी केलेली घोषणा, आता आपले वचन पाळणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 16:25 IST2025-11-14T16:24:51+5:302025-11-14T16:25:35+5:30
Bihar Assembly Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या जनसुराजचा सुपडा साफ!

...तर मी संन्यास घेईन; प्रशांत किशोरांनी केलेली घोषणा, आता आपले वचन पाळणार का?
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच, प्रशांत किशोर आणि त्यांच्या जनसुराज पक्षाची (JSP) आशा धुळीत मिळाली. राजकीय रणनितीकार म्हणून देशभरात नाव कमावणाऱ्या पीकेंनी बिहारच्या जनतेला तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न केला, मात्र जनतेनी त्यांना पूर्णपणे नाकारले. एकतर 10 पेक्षा कमी किंवा थेट 150 पेक्षा जास्त जागा निवडून येण्याचा दावा करणाऱ्या पीकेंचा या निवडणुकीत सुपडा साफ झाला आहे.
पीकेंच्या पदरी भोपळा...
एग्झिट पोल्सनी जनसुराजला 0-5 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता, परंतु प्रत्यक्ष निकालात JSP ला एकही जागा मिळाली नाही. याहून धक्कादायक बाब म्हणजे, ज्यांना प्रशांत किशोरांचे सर्वात मजबूत उमेदवार मानले जात होते, ते उमेदवारदेखील कोणत्याही ठिकाणी कडवी टक्कर देताना दिसले नाहीत. जनसुराजच्या रॅलींमध्ये मोठी गर्दी दिसत होती. अनेकांना वाटत होते की, किशोर NDA आणि महाआघाडी, दोघांनाही नुकसान पोहोचवतील. परंतु अंतिम निकाल यातले काहीही झाले नाही.
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
आता पीके संन्यास घेणार का?
निवडणूक प्रचारादरम्यान प्रशांत किशोरांनी एका राष्ट्रीय न्यूज चॅनलवर दावा केला होता की, नितीश कुमारांच्या जेडीयूला 25 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. जर मिळाल्या तर मी राजकारणातून संन्यास घेईन. पत्रकाराने पुन्हा विचारल्यावर पीकेंनी छातीठोकपणे आपल्या विधानाचा पुनरुच्चार केला. दरम्यान, आजच्या निकालात जेडीयू 85+ जागा मिळवताना दिसत आहे. अशा वेळी प्रशांत किशोर आपले वचन पाळतील का? हे पाहणे महत्वाचे आहे.