नितीश कुमारांच्या पराभवाचा दावा करणाऱ्या पीकेंना मोठा धक्का, 'जनसुराज'चा प्रयोग सपशेल अपयशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 11:36 IST2025-11-14T11:35:54+5:302025-11-14T11:36:28+5:30
Bihar Assembly Election 2025 : पहिल्यांदाच निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या पीकेंना मोठा धक्का बसला आहे.

नितीश कुमारांच्या पराभवाचा दावा करणाऱ्या पीकेंना मोठा धक्का, 'जनसुराज'चा प्रयोग सपशेल अपयशी
Bihar Assembly Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार, भाजपच्या नेतृत्वातील NDA ला स्पष्ट बहुमत मिळत आहे, तर काँग्रेसच्या नेतृत्वातील महाआघाडीचा दारुण पराभव होताना दिसत आहेत. अशातच, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाच्या कामगिरीकडेही अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या पीकेंना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पक्षाला केवळ 2-5 जागा मिळताना दिसत आहेत.
निवडणुकीपूर्वी प्रशांत किशोरनितीश कुमारांवर टीका करताना मोठमोठे दावे केले होते. जेडीयूला 25 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असा अंदाज त्यांनी वर्तवला होता. जनसुराज पक्षाने ग्रामीण भागाचे प्रश्न, बेरोजगारी, शिक्षण-आरोग्य यांसारख्या विषयांवर भक्कम मोहिम उभारली होती. त्यामुळे जनतेत नवीन पर्यायाची चर्चा निर्माण करण्यात हा पक्ष काही प्रमाणात यशस्वी झाला होता.
मात्र, आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, जेडीयू सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे, तर भारतीय जनता पक्ष त्या खालोखाल दुसऱ्या नंबरला आहे. यावरुन हे स्पष्ट होते की, राज्यात पुन्हा एकदा NDA चे सरकार स्थापन होणार आहे. दुसरीकडे, विरोधकांच्या महाआघाडीची कामगिरी अत्यंत निराशाजनक पाहायला मिळतेय. मतचोरी यात्रेच्या माध्यमातून भाजपविरोधात वातावरण तयार करणाऱ्या काँग्रेसला 10 चा आकडाही पार करता येईल का? असा प्रश्न उपस्थित होतोय. तर, दुसरीकडे तेजस्वी यादवांच्या राजदला 40 पेक्षाही कमी जागा मिळताना दिसत आहेत.