Bihar Assembly Election 2025 : बिहारमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. मात्र, आजच्या दिवसभरात राज्यातील अनेक ठिकाणी प्रचंड गोंधळ उडाला. लखीसराय जिल्ह्यात तर चक्क राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप उमेदवार विजय कुमार सिन्हा यांच्या वाहनावर आरजेडी समर्थकांनी शेण आणि दगडफेक केली. यादरम्यान, सिन्हा आणि आरजेडीचे विधान परिषदेचे आमदार अजय सिंह यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. दोघांनी एकमेकांवर एकमेकांनी शिव्यांची लाखोळी वाहिली. शेवटी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.
मतदानादरम्यान उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, विजय सिन्हा यांना माहिती मिळाली होती की, नदियावां भागात त्यांच्या समर्थकांना मतदान करण्यापासून रोखले जात आहे. त्यानंतर ते स्वतः परिस्थिती जाणून घेण्यासाठी तेथे पोहोचले असता, काही आरजेडी समर्थक संतप्त झाले आणि त्यांनी वाहनावर दगड व शेण फेकले. यावेळी आरजेडीचे अजय सिंह घटनास्थळी पोहोचले. दोघांमध्ये कॅमेऱ्यासमोरच तीव्र वाद झाला.
अजय सिंह दारू प्यायले...
विजय कुमार सिन्हा यांनी अजय सिंह यांच्यावर दारू प्यायल्याचा आरोप केला, तर अजय सिंह यांनी हा आरोप फेटाळला. पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थिती शांत केली आणि मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
राजदचे गुंडे मतदारांना धमकावत आहेत
सिन्हा यांनी राजदवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, राजदचे कार्यकर्ते आणि गुंडे मतदारांना घाबरवून मतदानापासून रोखत आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांच्या ताफ्यावर दगड, चप्पल आणि शेण फेकण्यात आले. त्याशिवाय बूथ क्रमांक 404 आणि 405 येथे अतिमागास वर्गातील मतदारांना धमकावून हाकलून लावण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
पोलिस अधीक्षकांवरही टीका
विजय सिन्हा यांनी लखीसरायचे पोलिस अधीक्षक यांच्याही भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, प्रशासनाने योग्य ती कारवाई केली नाही.
Web Summary : Bihar's Deputy CM Vijay Kumar Sinha clashed with RJD MLA Ajay Singh during the election. Supporters allegedly threw stones and cow dung at Sinha's vehicle, leading to heated arguments and accusations of voter intimidation. Police intervened to restore order.
Web Summary : बिहार के उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा चुनाव के दौरान राजद विधायक अजय सिंह से भिड़ गए। समर्थकों ने कथित तौर पर सिन्हा के वाहन पर पत्थर और गोबर फेंका, जिससे गरमागरम बहस और मतदाता डराने-धमकाने के आरोप लगे। पुलिस ने हस्तक्षेप कर शांति बहाल की।