कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 12:45 IST2025-11-14T12:43:51+5:302025-11-14T12:45:28+5:30
Bihar Assembly Election 2025 : लोकसभा निवडणुकीत 100% स्ट्राईक रेट देणाऱ्या चिराग पासवान यांनी यंदाही चमकदार कामगिरी केली आहे.

कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
Bihar Assembly Election 2025 : आज बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, NDA जबरदस्त आघाडीवर आहे. या आघाडीच्या विजयात सर्वाधिक चर्चा चिराग पासवान यांची होत आहे. मागील निवडणुकीत फक्त एक जागा जिंकलेल्या लोक जनशक्ति पार्टी (रामविलास) ने यंदा 29 पैकी 22 जागांवर आघाडी घेतल्याने चिराग यांचा ‘स्ट्राइक रेट’ आणि राजकीय वजन दोन्ही प्रचंड वाढले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, चिराग यांनी 100% स्ट्राइक रेटचा दावा सातत्याने केला होता. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, त्यांचा दावा अंशतः खरा ठरताना दिसतोय. NDA ने त्यांना 29 जागा दिल्या आणि त्यापैकी बहुतांश जागांवर आघाडी मिळवून, त्यांनी विश्वास खरा करुन दाखवला. यावरुनच 2020 मधील अपयशानंतर 2024-25 मध्ये चिराग यांचे पुनरुत्थान झाल्याचे स्पष्ट दिसते. NDA मध्ये त्यांचे महत्त्व तर वाढलेच, शिवाय या निकालांमुळे बिहारच्या पुढील राजकीय समीकरणांत त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते.
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, NDA 189 जागांवर, तर महाआघाडी 50 जागांवर आघाडीवर आहे.
NDA आणि महाआघाडीत कोण किती जागांवर लढले?
NDA (5 पक्ष)
भाजपा: 101
जेडीयू: 101
लोजपा(रामविलास): 29
राष्ट्रीय लोक मोर्चा (RLM): 6
हिंदुस्तानी आवाम मोर्चा (HAM): 6
नितीश कुमारांच्या पराभवाचा दावा करणाऱ्या पीकेंना मोठा धक्का, 'जनसुराज'चा प्रयोग सपशेल अपयशी
महाआघाडी (6 पक्ष)
राजद: 143
काँग्रेस: 61
सीपीआय (ML): 20
व्हीआयपी: 13
सीपीआय(M): 4
सीपीआय: 9