शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

वक्फ विधेयकासंदर्भात मोठी बातमी; उद्या विधेयकाच्या बाजूने मतदान करणार चंद्रबाबूंचा पक्ष; केल्या होत्या तीन सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 17:58 IST

...यामुळे, लोकसभेत जेडीयू देखील या विधेयकाला पाठिंबा देऊ शकतो, असे मानले जात आहे.

वक्फ (दुरुस्ती) विधेयकात तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) सुचवलेल्या तीनही सुधारणा स्वीकारण्यात आल्या आहेत. यानंतर आता, टीडीपीने विधेयकाला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या लोकसभेत  टीडीपी विधेयकाच्या बाजूने मतदान करेल. याच बरोबर, नितीश कुमार यांच्या जेडीयूचे प्रस्तावही स्वीकारण्यात आले आहेत. यामुळे, लोकसभेत जेडीयू देखील या विधेयकाला पाठिंबा देऊ शकतो, असे मानले जात आहे.टीडीपीने 'वक्फ बाय यूजर'शी संबंधित तरतुदीत सुधारणा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यानुसार, "वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५ लागू होण्यापूर्वी, नोंदणीकृत वक्फ बाय यूजरशी संबंधित सर्व मालमत्ता वक्फ मालमत्ता म्हणूनच राहतील, जोवर त्या वादग्रस्त अथवा सरकारी मालमत्ता नसतील. ही दुरुस्ती विधेयकात समाविष्ट करण्यात आली आहे.

याशिवाय, टीडीपीने असाही प्रस्ताव मांडला होता की, वक्फ प्रकरणांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना अंतिम अधिकारी मानण्याऐवजी, राज्य सरकार अधिसूचना जारी करू शकते आणि जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करू शकते. जो कायदेशीर चोकशी करेल. ही दुरुस्ती देखील विधेयकाचा एक भाग बनली आहे.

याशिवाय तिसरी मोठी दुरुस्ती डिजिटल कागदपत्रांची कालमर्यादा वाढविण्यासंदर्भात होती. आता, न्यायाधिकरणाला विलंबाचे कारण समाधानकारक वाटले, तर वक्फला डिजिटल दस्तएवज जमा करण्यासाठी अतिरिक्त 6 महिन्यांचा कालावधी मिळू शकेल. टीडीपीच्या या सुधारणा स्वीकारण्यात आल्यानंतर, पक्षाने विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूAndhra Pradeshआंध्र प्रदेशMuslimमुस्लीमNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीBJPभाजपा