मोठी बातमी! तेजस्वी यादवांच्या बंगल्यावर राजदचे ७६ आमदार बंदिस्त; तीन बेपत्ता...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 10:30 PM2024-02-10T22:30:42+5:302024-02-10T22:31:05+5:30

Bihar Politics Latest news: राजदचे ७९ आमदार आहेत. पैकी ७६ जणच तेजस्वी यादवांच्या बंगल्यावर आले आहेत. बाहुबलीची आमदार पत्नी दिल्लीला असल्याचे सांगत आहे...

Big news! 76 MLAs of RJD confined in Tejashwi Yadav's bungalow; Three missing before nitishkumar flore test bihar Political crisis | मोठी बातमी! तेजस्वी यादवांच्या बंगल्यावर राजदचे ७६ आमदार बंदिस्त; तीन बेपत्ता...

मोठी बातमी! तेजस्वी यादवांच्या बंगल्यावर राजदचे ७६ आमदार बंदिस्त; तीन बेपत्ता...

बिहारमध्ये पलटुराम नितीश कुमार यांच्या भाजपसोबतच्या सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. अशातच जदयूचे आमदारा संपर्कात असलेल्या लालू प्रसाद यादवांना आज जोरदार धक्का बसला आहे. बाहुबली आनंद मोहन याच्या मुलासह त्यांची पत्नी व एक डझन आमदार संपर्काबाहेर गेले होते. यामुळे तेजस्वी यादव यांनी सर्व आमदारांना आपल्या निवासस्थानी जमण्यास सांगितले होते. हे आमदार आल्यावर त्यांना बंगल्यातच कैद करून ठेवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 

या आमदारांना आता बहुमत चाचणीच्या दिवशीच बाहेर पडायला मिळणार असल्याचे सांगितले गेले आहे. तरीही तीन आमदार बेपत्ता झाल्याने नितीशकुमारांच्या बहुमत चाचणीत मोठा घोडेबाजार रंगणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

राजदचे ७९ आमदार आहेत. पैकी ७६ जणच तेजस्वी यादवांच्या बंगल्यावर आले आहेत. उरलेल्या तीनपैकी एका हे नितीश सरकारमध्ये मंत्री असल्याचे सांगितले जात आहे. राजद नेत्यांनी आमचे सर्व आमदार एकत्र जमले असल्याचा दावा केला आहे. नितीश कुमारांच्या बहुमत चाचणीला अपयशी ठरविण्यासाठी चर्चा करत असल्याचे म्हटले आहे. 

अनंत सिंह याची पत्नी नीलम देवी, मुलगा चेतन आनंद हे राजदपासून लांब झाले आहेत. यामुळे दुपारी ३ वाजता अचानक तेजस्वी यादवांच्या बंगल्यावर पोहोचण्याचा फतवा काढण्यात आला. हा फतवा व्हीपप्रमाणे असल्याने चेतन आनंद तिथे पोहोचले. त्यांनी आपण पक्ष सोडत असल्याची अफवा असल्याचे म्हटले आहे. 

कोण बेपत्ता...
तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी नीलम देवी या अनुपस्थित आहेत. त्या दिल्लीत असल्याचे सांगत आहेत. परंतु सर्व पक्षांनी आमदारांना पाटण्यालाच थांबण्याचे आदेश दिलेले असताना त्या दिल्लीत काय करत आहेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. तर अन्य दोन बेपत्ता आमदारांत माजी मंत्री कुमार सर्वजीत आहेत. ते बोधगयाचे आमदार आहेत. तर तिसरे आमदार हे नॉट रिचेबल आहेत. ओरंगाबादच्या एका विधानसभा मतदारसंघाचे हे आमदार असून त्यांचा राजद नेत्यांना फोनच लागत नाहीय. 

Web Title: Big news! 76 MLAs of RJD confined in Tejashwi Yadav's bungalow; Three missing before nitishkumar flore test bihar Political crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.