कर्नाटक निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये मोठा बदल; बीएन चंद्रप्पांची कार्याध्यक्षपदी तत्काळ प्रभावाने नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 10:17 IST2023-04-09T10:16:37+5:302023-04-09T10:17:23+5:30

गेल्या काही वर्षांपासून शिवकुमार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद सांभाळत आहेत.

Big change in Congress ahead of Karnataka elections; DK Shivakumar removed from the post of state president | कर्नाटक निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये मोठा बदल; बीएन चंद्रप्पांची कार्याध्यक्षपदी तत्काळ प्रभावाने नियुक्ती

कर्नाटक निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये मोठा बदल; बीएन चंद्रप्पांची कार्याध्यक्षपदी तत्काळ प्रभावाने नियुक्ती

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तयारीदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसने बीएन चंद्रप्पा यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी तत्काळ प्रभावाने नियुक्ती केली आहे.

सध्या डीके शिवकुमार कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद सांभाळत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ही नियुक्ती केली आहे. कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आर.के. ध्रुवनारायण यांचे गेल्या महिन्यात निधन झाले होते. त्यांच्या जागी बीएन चंद्रप्पा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कर्नाटक काँग्रेसमध्ये आता प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्याशिवाय पाच कार्याध्यक्ष आहेत. रामलिंगा रेड्डी, सलीम अहमद, ईश्वर खांद्रे, सतीश जारकीहल्ली यांचा समावेश आहे.

 

Web Title: Big change in Congress ahead of Karnataka elections; DK Shivakumar removed from the post of state president