शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांपूर्वीच भाजपला मोठा झटका, आमदाराने राजीनामा देत केला काँग्रेसमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 08:31 IST

कर्नाटकमध्ये यंदाच्या वर्षीच विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे.

बंगळुरू  - भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना चक्क एका भाजप आमदाराने पदाचा राजीनामा देत काँग्रेससोबत हातमिळवणी केलीय. कर्नाटकमधील लिंगायत समजाचा मोठा चेहरा असलेल्या पुतन्ना यांनी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. आता, ते बंगळुरू शहरातून आमदारकीची निवडणूक लढवणार आहेत. मात्र, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस पक्षातीलच काही पदाधिकाऱ्यांना त्यांना विरोध केला आहे. बंगळुरु येथेून तिकीट न देण्याची मागणी काँग्रेस नेते मनोहर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केलीय. 

कर्नाटकमध्ये यंदाच्या वर्षीच विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. तत्पूर्वीच, राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून बदलाचे वारे फिरत असताना दिसून येते, एकीकडे काँग्रेसने राज्यात सत्ता काबिज करण्याचा चंग बांधला असताना, आता भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे विधानपरिषद आमदार पुतन्ना यांनी राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माझी अंतरात्मा मला मारून टाकतेय की मी भाजपात प्रवेश केला. पक्षात ज्याप्रमाणे भ्रष्टाचार होतोय, त्याची कल्पनाही करता येणार नाही. त्यामुळेच, मी भाजपमधून बाहेर पडलो असून राजीनामा दिलाय, असे पुतन्ना यांनी म्हटले. 

दरम्यान, कर्नाटकमध्ये यावर्षी मे महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत भाजपाचा पराभव निश्चित मानला जात असून, काँग्रेसला २२४ पैकी १४० जागा मिळण्याची शक्यता आहे, असा दावा काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये करण्यात आला आहे. निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसे भाजपामधील अनेक विद्यमान आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केला आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकcongressकाँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूकBengaluruबेंगळूरMLAआमदार