शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

Independence Day : मोठी घोषणा! नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन आजपासून सुरु; पंतप्रधानांनी सांगितला फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 9:21 AM

Independence Day 2020 : देशाला सायबर हल्ल्यापासून वाचविण्यासाठी नवीन सायबर नीती आणणार असल्याचे मोदी म्हणाले. डिजिटल भारताने मोठी झेप घेतली आहे. गेल्या महिन्यात भीम अॅपद्वारे 3 लाख कोटींचे व्य़वहार झाले आहेत.

नवी दिल्ली : देशातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी योजना सुरु केली आहे. आज 74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लालकिल्ल्यावरून मोदींनी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची घोषणा केली. 

या योजनेद्वारे प्रत्येक नागरिकाचे हेल्थ कार्ड बनविले जाणार असून त्याद्वारे त्याच्यावर डॉक्टरांनी काय उपचार केले, कोणती औषधे दिली, त्याला असलेले आजार, डॉक्टरांनी केलेले निदान आदी माहिती ठेवली जाणार असल्याचे मोदी म्हणाले. मध्यमवर्गीयांसाठी ही योजना फायद्याची असणार असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले. 

याचबरोबर देशाला सायबर हल्ल्यापासून वाचविण्यासाठी नवीन सायबर नीती आणणार असल्याचे मोदी म्हणाले. डिजिटल भारताने मोठी झेप घेतली आहे. गेल्या महिन्यात भीम अॅपद्वारे 3 लाख कोटींचे व्य़वहार झाले आहेत. 2014 मध्ये केवळ 5 डझन ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडलेल्या होत्या. आता हा आकडा दीड लाखांवर गेला आहे. पुढील 1000 दिवसांत प्रत्येक सहा लाख गावांना याच्याशी जोडण्यात येणार आहे, असे मोदी म्हणाले.

 कोरोनाची लस कधी हा सर्वांना प्रश्न पडलाय. तीन लसी विविध टप्प्यात, प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याचा प्लॅन तयार आहे. शेतकरी बंधनमुक्त झाला. देशात कुठेही शेतमाल विकू शकतो. कामगारांसाठी शहरांमध्ये राहण्याची योजना राबविणार. पायाभूत सुविधांसाठी 110 लाख कोटीपेक्षा अधिक खर्च केला जाईल, विविध क्षेत्रात 7 हजार प्रकल्पांची निवड केली आहे. चार लेनचे हायवे बनविण्यासाठी काम करणार आहोत. परदेशी गुंतवणुकीने मागीलवर्षी सर्व रेकॉर्ड मोडले. एफडीआयमध्ये 18 टक्क्यांनी वाढ झाली असे मोदी यांनी सांगितले. 

"कोरोनाची लस कधी हा सर्वांना प्रश्न पडला आहे, वैज्ञानिक कठोर मेहनत करत आहेत, भारतात तीन लसी विविध टप्प्यात असून प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार" असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशवासियांना संबोधित करताना देशातील संशोधक कोरोना व्हायरसवर लस विकसित करण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत. भारतातील तीन लसी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत. संशोधकांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर मोठया प्रमाणावर लसीचे उत्पादन सुरू होईल. कमीत कमी वेळेत कोरोनावरील लस प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार आहे असं मोदींनी म्हटलं आहे. 

 

"आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, 130 कोटी देशवासियांसाठी मंत्र बनला आहे. आत्मनिर्भर होणे अनिवार्य आहे. जे कुटुंबासाठी आवश्यक आहे, ते देशासाठी आवश्यक आहे. भारत आत्मनिर्भर बनून दाखवेल. मला देशाच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास आहे. भारताने ठरवलं तर करुन दाखवतो. जगाला भारताकडून अपेक्षा आहे" असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

30 कोटी देशवासियांच्या संकल्पशक्तीने कोरोनावर विजय मिळवू. देशात मोठया प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्ती आहे. त्यात वाढ करण्याची आवश्यकता आहे. कच्चा माल कधीपर्यंत जगामध्ये पाठवत राहणार? त्यासाठी आत्मनिर्भर बनणे आवश्यक आहे असंही मोदींनी सांगितलं. जगाला भारताकडून उत्सुकता आणि अपेक्षा आहेत. आम्ही आत्मनिर्भर बनलो तर जगाला काहीतरी देऊ शकतो. जगाला कच्चा माल देऊन आम्ही किती दिवस पक्का माल खरेदी करणार आहोत? एके काळी परदेशातून गहू आयात केले जात होते. आज शेतकऱ्यांनी गहू भारतातच उत्पादित केला. गरजा पूर्ण झाल्या आणि इतर देशांना तो पाठविला जातो. कृषी क्षेत्राला कायद्यातून मुक्त केला, असे मोदी म्हणाले.

अन्य महत्वाच्या बातम्या...

आजचे राशीभविष्य - 15 ऑगस्ट 2020; जुने येणे वसूल होईल

IndependenceDay लाल किल्ल्यावरून कोरोना योद्ध्यांना नमन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण

Independence Day 2020 : "देशात तीन लसी विविध टप्प्यात, प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार"

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनNarendra Modiनरेंद्र मोदी